Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सांगली: आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थांना जेवणातून विषबाधा, विध्यार्थी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 28, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
सांगली: आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थांना जेवणातून विषबाधा, विध्यार्थी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील उमदा येथील समता आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना रविवारी रात्रीच्या सुमारास जेवणातून विषबाधा झाली. त्यामुळे काही काळ या आश्रम शाळेत एकच खळबळ माजली होती. यामधील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून काही विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांगली जिल्हातील जत तालुक्यात असलेल्या उमदी येथे समता आश्रम शाळेत जेवणातून विद्यार्थांना विषबाधा झाल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्याथ्र्यांचा जीवाशी खेळ सुरू असल्याचे या घटनेवरून समोर येत आहे.

समता आश्रम शाळेतील राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणातून विषबाधा होऊन प्रकृती बिघडल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. एकाच वेळी 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं एकच धावपळ उडाली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना माडग्याळ येथील ग्रामीण प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. तर यातील काही मुलांची प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

उमदी येथील असणाऱ्या समता आश्रम शाळेत सुमारे 200 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये 5 वर्षांपासून 15 वर्षांपर्यंत मुला-मुलींचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे रात्री आश्रम शाळेकडून मुलांना जेवण देण्यात आलं. मात्र, रविवारी रात्री देण्यात आलेल्या जेवणानंतर मुलांना एकाच वेळी अचानक उलटी, मळमळ आणि जुलाब सुरू झाले. 170 पेक्षा जास्त मुलांना एकाच वेळी त्रास होऊ लागल्यानं आश्रम शाळा प्रशासनाकडून उपलब्ध असणाऱ्या वाहनातून रात्रीच्या सुमारास माडग्याळ येथील ग्रामीण प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र, याठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी असल्यानं काही विद्यार्थ्यांना जत येथील ग्रामीण प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आलं. तर सुमारे 50 पेक्षा जास्त मुलांची प्रकृती जास्त बिघडल्यानं त्यांना मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलांना जेवण आणि बासुंदी देण्यात होती. त्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एकाच वेळी 170 मुलांना झालेल्या विषबाधा घटनेनं एकच खळबळ उडली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश: या प्रकरणाची जिल्हाधिकारी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा तपास करून 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी समाज कल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत. आश्रमशाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भंडारामधील येरली येथे असलेल्या खासगी आदिवासी आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना 25 ऑगस्टला घडली होती. या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Previous Post

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मग वाद, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह नागपुर हादरल.

Next Post

बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे अधिमंडळाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे अधिमंडळाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न.

बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे अधिमंडळाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In