शहीद वीर माता मैनाबाई अर्का यांचे हस्ते उदघाटन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी अंतर्गत येत असलेल्या उपपोलिस स्टेशन राजाराम खां.च्या वतीने पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी चे देशमुख यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी अधिकारी साहेबराव कासबेवाड यांच्या नेतृत्वाखाली राजाराम येथे वीर शहीद दिनकर अर्का सार्वजनिक वाचनालय शहीद वीर माता मैनाबाई अर्का यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार माझी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प अजय नैताम, प्राथमिक आरोग्य पथकाचे नितीन धकाते, पोलीस पाटील सत्यम भांडारवार, पोलीस पाटील दामा गावडे, एच.के आकदर, माजी उपसरपंच सुरक्षा आकदर, नारायण कंबगौनीवार, मुत्ता पोरतेट आदी उपस्थित होते. या प्रसंगी उप पोलीस स्टेशन ते वाचनालय केंद्रापर्यन्त पुस्तक दिंडी यात्रा काढण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार पोलीस शिपाई संतोष करमे यानी मानले.यावेळी विनायक आलाम, राकेश सिडाम, अनिल पेंदाम, सपना मारकवर, अनिता आलाम, राकेश तलांडे, दीपक अर्का, राकेश सडमेक, कोंडय्या केकर्लावार, संजय पोरतेट, मुन्ना वेलादी,विलास दुर्गे, राजेश दुर्गे, तसेच राजाराम पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते करिता जिल्हा पोलीस अंमलदार वर्ग सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

