तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
98224 77446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विरूर स्टेशन :- जवळ असलेल्या वर्धा नदीत विरूर येथील दोन तरुण युवक रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मच्छी पकडण्याच्या निमित्ताने गेले असता यात नितेश सुधाकर पेटकर वय २८ याचा मच्छी पकडताना नदीत तोल जाऊन पडल्याची घटना काल सायंकाळी ५ ३० वाजता सुमारास घडली. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विरूर स्टेशन इंदिरानगर येथील नितेश सुधाकर पेटकर व दीपक वरवाडे हे दोन तरुण युवक रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जवळ असलेल्या वर्धा नदीत धानोरा शेतशिवारात काठीला बांधून गरीच्या सहाय्याने मच्छी पकडण्यासाठी गेले असता वर्धा नदीच्या काठावर मच्छी पकडत होते. त्या दोघांमध्ये काही अंतर असल्यामुळे ते एक दोघे एकमेकाला दिसत नव्हते सायंकाळी घरी परतण्याच्या वेळेस दिपक वरवाडे हा नितेशला बोलावण्यासाठी गेला असता त्याची पकडलेली मच्छी व मच्छी पकडण्याची काठी व चप्पल त्या ठिकाणी होती दीपक ने नितेश बोलवण्यासाठी आरडा ओरड करून नितेश दिसत नव्हता त्यामुळे दिपक वरवडे यांनी घरी येऊन घरच्यांना माहिती देऊन लगेच विरूर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळवली.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पोलीस बचाव पथक चंद्रपूर यांना घटनेची माहिती दिली त्या आधारे बच्याव पथकाचे पोलीस हवालदार अशोक गर्गेलवार यांच्या पाथकाने बोटच्या सहाय्याने आज सायंकाळी ५: ३० वाजताच्या सुमारास नितेश सुधाकर पेटकर वय २८ याचा मृतदेह घटनास्थळाच्या ठिकाणी मिळाला असून शवविच्छेदना करिता राजुरा येथे पाठवण्यात आले. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष कुळमेथे करीत आहे.

