उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना अहमदनगर मध्ये श्रीरामपूर तालुक्यात घडली या घटनेचा जाहीर निषेध दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडून करण्यात आला. यावेळी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
कबुतरं चोरल्याच्या संशयावरून हरेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगरमध्ये 3 लहान बहुजन दलित मुलांना झाडाला लटकावून अमानुष मारहाण केली. घरातुन बाहेर नेऊन एकाच्या अंगावर लघुशंका केली, त्याला थुंकी चाटायला लावली, कपडे काढून झाडाला लटकावून बेदम मारहाण केली, वरून बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी आरोपीनी पोरांना दिली. शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशया वरून ज्यांनी कायदा हातात घेऊन हरेगाव मधील दलित मुलांना अमानुष मारहाण केली. त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करा.
या मानवतेला काळीमा फासणारी ही घटना श्रीरामपूर मध्ये घडली या घटनेचा आम्ही दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वतिने जाहीर तीव्र निषेध करतो. आरोपीना तात्काळ अटक करा, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, सर्व आरोपींना अटक करा. कायदा सुव्यवस्था जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर तात्काळ या जातीयवादी आरोपींना अटक करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखा यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निवेदन देतेवेळी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखा अकोला जिल्हा अध्यक्ष डॉ अरुण चक्रणारायण, जिल्हा कार्याध्यक्ष देवीलाल तायडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे, यंशवत इंगोले, जिल्हा सचिव एम.एम तायडे सर पर्यटन विभाग प्रमुख नंदरत्न खंडारे, जिल्हा सदस्य मधुकर सिरसाठ, युवा कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.