देवेंद्र सिरसाट, हिंगणा, नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- स्वामी विवेकानंद युथ मल्टीपर्पज सोसायटी हिंगणा द्वारे संचालित ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन मुलांच्या हातावर राखी बांधून शाळकरी बहिणींना रक्षेचे वचन चिमुकल्या शाळकरी भावांकडून घेवुन सर्व चिमुकल्या भगिनींनी लाडक्या बंधू राजाला राखी बांधुन हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. व या रक्षाबंधनानिमित्त शाळेमध्ये राखी मेकिंग स्पर्धेचाही आयोजन करण्यात आला व या स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी आकर्षक राखी तयार करून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने त्या स्पर्धेकरिता आणलेल्या राख्यांकडे आकर्षित करून जिंकली. तर काहींनी प्रत्यक्षात पृथ्वी व चंद्र यांच्यामधील रक्षाबंधन चंद्रयानाच्या माध्यमातून हाताने बनवलेल्या राख्या तर विविध कल्पना करून तयार केलेल्या उत्कृष्ट राख्या या स्पर्धेकरिता चिमुकल्या मुलांनी घरून तयार करून आणल्या यामध्ये नर्सरी वर्गामधून प्रथम क्रमांक कायरव साहू, दुर्वी पंचबुधे, द्वितीय क्रमांक रुहानी वासनिक, दीपांशू बारेकर, तृतीय क्रमांक खुशील बारेवार यांनी पटकाविला. तर प्रोत्साहन पर म्हणून जिनिशां नीनावे हिला देण्यात आले.
तर के.जी. 1 वर्गा मधून प्रथम क्रमांक शिवांश पटले, द्वितीय क्रमांक वंश खोब्रागडे, तृतीय क्रमांक धैर्या बिजेवार व वंश बागडकर तर प्रोत्साहन पर स्वरा पांडे यांना देण्यात आले. व के.जी. 2 वर्गातुन प्रथम क्रमांक यतिक तुरविले, द्वितीय क्रमांक माहिर शाहू, तर तृतीय क्रमांक पुनम मलघाटी व तामेश यादव मानकरी ठरले. तर प्रोत्साहन पर म्हणून अथर्व जंघेला व मिस्टी मिसारे यांना देण्यात आले यावेळी वर्षा खोब्रागडे, प्रतीक्षा राऊत, नेहा बोपचे, स्नेहल पंचबुधे, दिव्या हनवत, रूपा बोटावार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक कमलेश खोब्रागडे होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

