आकाश पांचाळ पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पूणे:- पुण्यात 12 वर्षा अगोदर एका प्रेमाच्या त्रिकोणातून युवकाचा संगमत करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी महत्वपूर्ण निकाल पारित करत पाच आरोपींना जन्मठेप आणि एक लाख ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तब्बल बारा वर्षानंतर पोलिसाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला. प्रवीण दत्तात्रेय चौगुले वय 25 वर्ष, यशवंत रामचंद्र खामकर वय 24 वर्ष अनिल बहिरू अजगेकर वय वय 21 वर्ष, गोट्या ऊर्फ देवेंद्र अशोक माने वय 20 वर्ष आणि रमेश रंगल्या देवदुर्ग वय 20 वर्ष सर्व रा. कोल्हापूर अशी शिक्षा झालेल्या आरोपीची नावे आहेत.
राज्य गुप्त वार्ता विभाग कार्यरत पोलिसाचा मुलगा असलेला प्रतीक प्रमोद जगताप वय 19 वर्ष, रा. धानोरी याची 26 सप्टेंबर 2011 मध्ये शिक्रापूर कॅनल जवळ रस्तावर हत्या करण्यात आली होती. ही घटना समोर येताच आरोपींवर विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मध्ये विविध कलमे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी या घटनेचा तपास करून सबळ पुरावे जमा केले होते.
हे प्रकरण सूनवणी करीता न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी या खटल्याचे कामकाज सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाली आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत न्यायालयानेही निकालात प्रेमाच्या त्रिकोण या शब्दाचा उल्लेख केला आहे.
दंडाच्या रकमेतून एक लाख 50 हजार रुपये रक्कम प्रतीकच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. गुन्हा शाबीत करण्यासाठी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि टीडीआर ( टोल डिटेल रेकॉर्ड) महत्त्वपूर्ण पुरावे ठरले.
काय आहे घटना…
हत्या करण्यात आलेल्या दिवशी आरोपी प्रवीन याने प्रतीकला विमानतळ पार्किंग गेट येथे भेटायला बोलावले होते. तेथून त्याचे अपहरण करून कारमध्ये त्याची गळा आवळून हत्या करण्यात आली. प्रतीकची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह आरोपींनी जवळ असलेल्या झाडीत नेवून पेटवून दिला होता.
यामुळे झाला खून
अपर्णा हिचे मृतक प्रतीकबरोबर प्रेमसंबंध होते. याबाबत प्रतीकच्या घरी समजल्यानंतर त्याच्या आईने अपर्णा हिच्या घरी जाऊन आपल्या मुलाचा नाद सोडण्यास सांगितले होते. त्यामुळे घरचे लग्न लावतील म्हणून अपर्णा प्रतीक बरोबर पळून गेली. ते दोघे एका बीपीओमध्ये पार्टटाईम नोकरी करू लागले. तेथे अपर्णाची ओळख प्रवीणशी झाली. त्यानंतर अपर्णा ही प्रवीण बरोबर एकत्र राहू लागली. त्यामुळे प्रवीणने तिला लग्नासाठी विचारणा केली. पण तिने प्रतीक बरोबर प्रेमसंबंध असल्याचे प्रवीणला सांगितले. त्यामुळे प्रवीणने मित्रांच्या मदतीने प्रतीकचा काटा काढण्याचा कट रचला होता.
असा लागला गुन्ह्याचा छडा –
हत्या करण्यासाठी पाचही आरोपी इचलकरंजी वरून पुण्यात आले होते. तपासादरम्यान पाचही आरोपींचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन हे शिक्रापूर पर्यंत दिसले. इचलकरंजी ते पुणे आणि पुणे ते इचलकरंजी मार्गावरील टोलनाक्यांवर आरोपींची गाडी दिसून आली. यातून त्यांचा कट उघडकीस आला. प्रतीकच्या मोबाईलवरून मेसेज पाठविल्याचे लोकेशन आणि मुख्य आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन एकच दिसून आले. यातून गुन्ह्याचा छडा लागला.