पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- फिर्यादी यांची परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणुक झाल्याने फिर्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे प्रथम प्राप्त तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी मध्ये फिर्यादी यांना शालिनी शर्मा मोबाईल क्रमांक ९९३८९४९४०९ ७८३८४२५८९४ आणि करण सिंग यांचे मोबाईल क्रमांक ९७३४७७२७६३. ८७५०६४०५३६, ८७१८१६६५४५ यावरून संपर्क करून ते Top Career Consultancy या सल्लागार कंपनीमध्ये कामकरीत असल्याचे सांगुन फिर्यादी यांचे इमेल आयडीवर hrshalinisharma12142029@gmail.com आणि rmkaransingh@topcar eerconsultancy.com या ईमेल आयडीद्वारे फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन त्यांना Volkswagen Group कॅनडा या देशामध्ये सिनियर जनरल मॅनेजर या पदावर नोकरी मिळवुन देतो असे सांगुन त्यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगुन शालिनी शर्मा व करण सिंग यांनी दिलेल्या https://pg.sambhavpay.com/93Xexaaaxfax या लिंकवर वेळोवेळी एकुण ११,९१,४१९ /- रुपये पाठवण्यास भाग पाडून आर्थिक फसवणुक केली असल्याने फिर्यादी यांनी दि. १८/०७/२०२३ रोजी फिर्यादी दिल्याने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु. रजि.नं. ११३ / २०२३. भा. द. वि. कलम ४१९, ४२०३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६सी, ६६डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हा करताना वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करून आरोपीतांचा ठावठीकाणा हा दिल्ली व गुडगांव, हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे दिल्ली व गुरगांव, हरियाणा येथे सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील पोलीस पथक पाठवून सदर गुन्हयातील फिर्यादी यांना संपर्क साधून फसवणूक करणाऱ्या टोळीतील एक आरोपी नामे जयंत कुमार मलिक पुत्र श्री परमानंद मलिक, वय- २९ वर्षे, रा. पार्क क्यू रेसीडेन्सी, सेक्टर- ६, फ्लॅट नं. ९०६, पालमविहार, गुडगाव, हरियाणा दि. २४/०८/२०२३ रोजी अटक करून त्यास योग्य त्या न्यायालयीन परवानगी घेऊन त्यास सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे घेऊन आलो असता त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता अटक आरोपीस दि. २९/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून १ लॅपटॉप व ३ मोबाईल संच व गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम १२ लाख रूपये हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिनल सुपे पाटील हे करीत आहेत.सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडून आव्हान करण्यात येत आहे की, वर नमुद मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी यांचा वापर करून कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेशी संपर्क करावा.
सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर, मा. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, मा. नंदा पाराजे, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली व पो. नि मिनल सुपे-पाटील पोउपनि सचिन जाधव, पोउपनि संदीप कदम, पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, रेणुका रजपुत, निलम नाईकरे सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांनी केला असून तपासामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे..

