✒️दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
पुणे:- खेड तालुक्यात एक संतापजनक बातमी समोर येत आहे. त्यामुळे महिला बरोबर पाळीव प्राणी पण सुरक्षित नाही अस या घटनेवरून समोर येत आहे. त्यामुळे सर्विकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एका 65 वर्षीय नराधमांने मुक्या प्राण्यावर म्हणजे कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर रा. टाकळकरवाडी ता. खेड असे या विकृत नराधमाने नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी या नराधमाला बेळ्या ठोकल्या आहे.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीनुसार राजगुरूनगर शहरालगत टाकळकरवाडी येथे भिवसेन टाकळकर राहतात. राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवुन घरामध्ये घेवुन वेळोवेळी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार नराधम टाकळकर करत होता. हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. या घटनेचा व्हिडिओ देखील काढण्यात आला आहे. त्याच्यावर आयपीसी कलम 376 अप्राकृतिक गुन्हे आणि क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करत आहे.
