विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयामध्ये नुकताच रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन मुख्याध्यापक माळी सर होते. याप्रसंगी विद्यालयाच्या उपशिक्षिका वृषाली बेल्हेकर यांनी आपल्या मनोगतात रक्षाबंधन सणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळी बहिणीचे भावाप्रती असणारे प्रेम व त्या प्रेमाच्या पोटी भावाचे आपल्या बहिणी विषयी असणारे कर्तव्य, तिच्या रक्षणाची जबाबदारी याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रमोद तोरणे यांनी केले.
त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी भावांना मोठ्या प्रेमाने व आदराने राख्या बांधून आनंद व्यक्त केला. यावेळी भावाने देखील आपल्या बहिणीसाठी छोटीशी भेटवस्तू म्हणून पेन व चॉकलेट देऊन त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यालयातील महिला शिक्षिकांनी देखील शिक्षकांना राख्या बांधल्या. शिक्षकांकडून आपल्या महिला भगिनींना पर्सच्या स्वरूपात याछोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष कदम यांनी सर्व नियोजन केले. तर निर्मला लावरे, छाया जेजुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन चौधरी, वामन घोडसरे, रोहिदास पोटकुले, ज्ञानेश्वर केदार, सखाराम शिंदे, संतोष सोनवणे, प्रदीप तडवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रतीक्षा थोरात यांनी केले तर आभार रोहिणी देव्हारे यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348