Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

देशाचे व्यापक राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे राज्यपाल याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
देशाचे व्यापक राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे राज्यपाल याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 3:- देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान आहे. देशाला जागतिकस्तरावर पुढे ठेवण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने परिवर्तनाचा दृष्टीकोण ठेवला आहे. हे धोरण नव्या पिढीला मातृभाषेत शिक्षणाला प्रोत्साहन देते. युवकांनी देशाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी तयार झाले पाहिजे, असे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकुलपती डॉ. प्रशांत बोकारे, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, आ.डॉ. पंकज भोयर, आ.दादाराव केचे, पोलिस अधीक्षक नूरुल हसन, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.

सुरुवातीस राज्यपालांनी महाकाली शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतूक केले. मागील आठवड्यात चंद्रयान तीन ही मोहिम यशस्वीपणे पुर्ण झाली. यामुळे जगभरात देशाचे नाव झाले. दक्षिण धृवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. या मोहिमेनंतर आदित्य एल -1 ही मोहिम देशाने हाती घेतली आहे. देशाचे नाव जगात लौकिक करणाऱ्या या घटना आहे.
भारताने जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. देशात होत असलेली शैक्षणिक प्रगती आपल्या विकासाचा आधार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने परिवर्तनवादी दृष्टीकोण स्विकारला आहे. आजचे जग हे कौशल्याचे आहे. कौशल्य अंगिकारत आम्हाला प्रयोगशिल होणे आवश्यक आहे. भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून भारत करत आहे, असे राज्यपाल म्हणाले.

सार्वजनिक खर्चातून चालविल्या जाणारी आपली शिक्षण प्रणाली जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची प्रणाली आहे. देशात अनेक ठिकाणी राज्य, केंद्रीय विश्वविद्यालये, मानद, खाजगी विद्यापीठे, राष्ट्रीय महत्वाच्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. देशाच्या विकासात या संस्था महत्वाचे योगदान देत आहे. जागतिकस्तरावर आपल्या अधिकाधिक संस्थांना मानांकन कसे प्राप्त होईल. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. देशाने 50 टक्के सकल नामांकन रेषो प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे राहणार आहे.

विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर नव्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रमांचे सुसुत्रिकरण, आधुनिकिकरण व उच्च शिक्षण प्रणालीचा अंगिकार करावा लागेल. आजच्या आधुनिक काळात केवळ साक्षर होऊन उपयोग नाही तर एआय साक्षर होणे गरजेचे आहे. युवकांमध्ये मोठी ताकद आहे. युवकांनी संपुर्ण जग आपले कार्यक्षेत्र मानले पाहिजे. स्वत:ला काही क्षेत्रांपुरते मर्यादीत न ठेवता देशातील कोणतेही राज्य आणि जगात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन राज्यपालांच्याहस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सादर केला. उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, डॉ. प्रशांत बोकारे, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार संध्या शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

शिवशंकर सभागृहाचे उदघाटन
महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने बांधण्यात आलेल्या शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. दादाराव केचे, आ.डॅा.पंकज भोयर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे उपकुलपती डॅा.सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकुलपती डॅा.प्रशांत बोकारे, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस यांचे वर्धा येथे स्वागत
महामहिम राज्यपाल रमेश बैस यांचे वर्धा येथे आगमण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचे सुतमाला देऊन स्वागत केले. यावेळी नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर जिल्हाधिकार नरेंद फुलझेले, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्नीहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

Previous Post

नागपूर लकडगंज पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना उमया शंकर शाळेतील मुलींनी राखी बांधून रक्षाबंधन केले साजरे.

Next Post

न्यू इंग्लिश स्कूल व विद्यालय अस्तगाव येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
न्यू इंग्लिश स्कूल व विद्यालय अस्तगाव येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल व विद्यालय अस्तगाव येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In