उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व असंघटित आरोग्य, बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटना आणि सेवक लोकहित मंचकडून संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमरफारुक ककमरी यांच्या सल्ल्यानुसार सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हिंगणगाव तालुका कवठेमहांकाळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पेन व पुष्पगुच्छ, गुलाब फुले देऊन शिक्षण दिन साजरा करण्यात आले. त्या वेळेस विषेश उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती समाज कल्याण चंद्रकांत दादा लोंढे, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री सुखदेव चंदनशिवे सर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी होते.
त्या वेळेस सर्व बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दार उघडणारे जोतीबा फुले, सावित्रीमाई फुले, तसेच त्यांना खंबीर साथ देणाऱ्या फातिमा शेख याच्या परीश्रमाला त्याच्या त्यागाची आठवण करत त्यांना नमन करण्यात आले. यावेळी उपस्थितीता कडुन सेवक संघटना आणि लोकहित मंचकडून करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. त्या वेळेस तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष आलोक कांबळे, तालुका महासचिव प्रथमेश बनसोडे, आकाश भोसले, प्रफुल चव्हाण, गौरव लोंढे, विनीत लोंढे, सोमनाथ मोरे,तन्मय गाडे चंद्रकांत (आबा) लोंढे,श्रीमान नारायण तातोबा सगरे,भांडकुळे रकमा कृष्णा सर निखिल ढेरे आदि उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

