पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- इसम नामे अभिजीत अनिल रतवेकर वय ३६ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. समर्थ कॉम्प्लेक्स, फ्लॅट नंबर ३७, मानाजी नगर, न हे गाव पुणे यांची मारूती सुझुकी कंपनीची इर्टिका कार नंबर एम.एच.१२/एन.पी./ १६३७ कि. रु. ५,५०,०००/- ची ही गाडी इसम नामे सयाजी पाटील रा. तात्याबा कॉम्प्लेक्स, न-हे, पुणे याने शिरवळ येथील कंपनीत महिना ५०,०००/- रूपये भाडे तत्त्वावर लावून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून गाडी घेवून जावून कोणताही परतावा न देता त्यास वारंवार विनंती करूनही त्याने तक्रारदार यांची गाडी परत न करता फसवणुक केली म्हणून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४११/२०२३ भादंविक ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हयाचा तपास राहुल पवार पोलीस उप-निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३. पुणे शहर हे करत असताना आरोपी नामे सयाजी ज्ञानदेव पाटील, रा. फ्लॅट नंबर १०१ तातोबा कॉम्प्लेक्स, मानाजी नगर, नऱ्हे, पुणे मळ गाव अमनापुर, ता. पलुस, जि. सांगली यास. ( पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते ) यांना मिळालेल्या बातमीवरून पकडून त्यास अटक करून त्याचेकडे तपास करता त्याने खालील इसमांची तक्रारदार यांचेप्रमाणे फसवुणक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १) रामेश्वर दामोदर शेळके रा. यशोदिप चौक, वारजेमाळवाडी, पुणे यांची किं. रु.७,००,०००/- मारुती सुझुकी कंपनीची डिझायर कार नंबर एम.एच.१२ / के. एन. ८५४५ २) रविंद्र जनार्धन जाधव रा. प्रियंका डेव्हलपर्सफ्लॅट नंबर ३०३, पौर्णिमा हाईटसजवळ, न-हे, पुणे यांची किं. रू. ४,००,०००/- ची फोर्ट कंपनीची फियस्टा नंबर एम. एच. १२/डि.एस./५२२० ३) शशीकांत अमृत बरगे रा. मु. पांढरवाडी, पो. डिकसळ ता. खटाव जि. सातारा यांची किं. रू.१,००,०००/- मारुती सुझुकी कंपनीची इर्टिका कार नंबर एम.एच. ११/डि.ओ./०६८४ ४) बाबु शंकर राठोड वय ४५ वर्षे रा. गणेश नगर, बोपखेल, पुणे यांची किं. रु.६,००,०००/- ची• सुझुकी कंपनीची इर्टिका कार नंबर एम.एच.१४/ के.एफ. ०४३०५) विभुते याची किं. रू ७,००,०००/- ची मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार नंबरएम.एच.४५/ ओ.सी.७९८७६) गणेश सोपान धोत्रे रा. स. नं. ३२/१८ धायरीगाव, पुणे यांची किं. रु.५,००,०००/- मारुती सुझुकी कंपनीची वॅगनआर कार नंबर एम. एच. १२ / आर.टि. ४२०८ ७) तसेच दाखल गुन्हयातील तक्रारदार यांची किं. रू. ५,५०,०००/- ची मारूती सुझुकी कंपनीची इर्टिका कार नंबर एम.एच.१२/ एन.पी./ १६३७ करण्यात आलेल्या आहेत.अशा एकुण ७ चार चाकी वाहने किं. रू. ४३,५०,०००/- च्या नमुद आरोपीकडून जप्त आरोपीकडे केले तपासात त्याने सदरचा गुन्हा हा स्वतः मौजमजा करण्याकरीता केला असल्याचे तपासात सांगीतले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उप- निरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, सतीश कत्राळे, प्रकाश कटटे, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, साईनाथ कारके, गणेश शिंदे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.

