हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- ओबीसी, व्हिजे, एनटि, एसबीसी प्रवर्गागातील विद्यार्थांच्या विविध मागण्यासाठी समन्वय समिती, बल्लारपूर व्दारे तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, ईतर मागास बहुजन कल्याण मंत्री समाज कल्याण मंत्री आणि सचिव ईतर बहुजन कल्याण विभाग यांना विवेदन देण्यात आले.
आज दि 4 सप्टेंबर 2023 रोज ला राज्यभरात ओबीसी, व्हिजे, एनटि, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वस्तीगृह सुरू करणे, स्वाधारच्या धरतीवर आधार योजना राबविणे आणि परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या 75 करणे, हे विद्यार्थ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या तिन्ही योजना येत्या 11 सप्टेंबर पर्यंत सुरू न झाल्यास12 सप्टेंबरला भिकारी असलेल्या सरकारच्या विरोधात राज्यभरात भीक मागो आंदोलन केले जाईल आणि आणि यातून जमा होणारी निधी राज्य सरकारच्या वित्त विभागाला मनी ऑर्डर द्वारे पाठवल्या जाईल, असा इशारा ओबीसी, व्हिजे, एनटी, एसबीसी ओबीसी समन्वय समिती, बल्लारपूर व्दारे नायब तहसीलदार सतीश साळवे बल्लारपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, सचिव ईतर मागास बहुजन कल्याण विभाग व व वित्त विभाग यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
हे निवेदन देताना सुधीर कोरडे, शंकर काळे, उमेश कडू, विवेक खुटेमाटे, केशव थिपे, अमोल काकडे, रणजीत धोटे, आकाश दुर्गे, मनोज देरकर, बादल भाऊ ऊराडे, भास्कर वडस्कर, उमेश शेंडे, पराग जांभुळकर ओबीसी समन्वय समिती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

