संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात एका प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात राहणाऱ्या एक तरुण व तरुणी एकामेकावर जीवापाड प्रेम करत होते. पण पुढील वाटचाल खूप अवघड असेल असे त्यांना वाटत असल्यामुळे या प्रेमी युगुलाने खळबळजनक पाऊल उचलले आणि एकच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरव बगमारे आणि जान्हवी नायले असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचे नाव आहे.
गळफास घेतलेले प्रेमी युगुल हे दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत होते. काल मध्यरात्रीचा सुमारास गौरव बगमारेच्या घराशेजारील वापरात नसलेल्या घरात दोघे गेले आणि तिथेच गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली. दोघांवर काही दबाव होता का आणि त्याचा आत्महत्येशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

