मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील विविध मार्गाची अवस्था अतिशय खराब झालेली असून येत्या पंधरा दिवसात या मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास प्रहार स्टाईलने अनोखे निद्रा आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना एका निवेदनातून दिलेला आहे.
निवेदनातून देण्यात आलेल्या सविस्तर माहितीनुसार, हिंगणघाट शहरातील तेलंगखेडी चौक ते उपजिल्हा रुग्णालय चौक या मार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून अतिशय कासव गतीने सुरू असल्याने या मार्गाची पूर्ण दुरावस्था झालेली असून या मार्गावर चार दवाखाने, दोन शाळा असल्याने हा मोठा रहदारीचा मार्ग आहे. हा मार्ग ठिकठिकाणी फोडून असल्याने पावसाळ्यात या मार्गावर चिखलाचे मोठे साम्राज्य निर्माण झालेले आहे या व संपूर्ण गावातील विविध प्रभागातील उदाहरनार्थ फिदाहुसेन पेट्रोलपंप ते माता मंदिर,चेपे चौक ते कबरस्थान चौक,डॉ आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय चौक व गावातील अनेक मार्गाची विविध विकासकामांच्या नावावर तोडफोड करून गलितगात्र व चालण्यास अयोग्य करून ठेवलेले आहे. ह्या मार्गाची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. ह्या अनेक मार्गावरून दुचाकी वरून जाणे तर सोडाच पायी चालणेही कठीण झालेले आहे.
ही रस्त्याची कामे करणारी यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग,नगर परिषद या दोन्ही विभागांचे रस्त्यांचे काम अतिशय वाईट पध्दतीने सुरू आहे.
विशेष म्हणजे या सर्व विकासकामांवर मागील 8 ते 9 वर्षात अक्षरशः पैशाचा पाऊस झालेला आहे.आजवर या शहराच्या विकास कामासाठी हजार ते दोन हजार करोड रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे जनतेला सांगण्यात येते.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रावर सोडलेल्या चंद्रयानाचा खर्च केवळ ६१५ करोड रुपये असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे या गावाच्या विकासासाठी या चंद्रयानाच्या रक्कमे पेक्षाही दुप्पट रक्कम खर्च होऊनही गाव मात्र पूर्वी पेक्षा अधिक भकास झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आजवर या गावाच्या विकासासाठी जो निधी आला त्याचे ऑडीट करून यंत्रणांची सखोल चौकशी करावी अशी आमची मागणी आहे.
उपरोल्लीखित रस्त्यांच्या कामाची त्वरित दुरुस्ती न झाल्यास येत्या १५ दिवसानंतर आम्ही आमच्या संघटनेतर्फे शहरातील कोणत्याही मार्गावर निद्रा आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे.
निवेदन सादर करतेवेळी सर्वश्री सुरज कुबडे, सतीश गलांडे, राजेश बोभाटे, रितेश गुढधे, सागर आत्राम, राजेश लखाणी, रामा पोतदार, शेखर जामुनकर, प्रशांत आवारी, मयूर पुसदेकर, विशाल ठाकूर, आकाश तळवेकर, सुमित भोयर, संतोष जोशी, सुधीर मोरेवार, अतुल चिंतलवार, पवन वाघमारे, तबरेज खा पठाण, विनोद राऊत, गोलू उजवणे, मोंटू राऊत, अमोल सावसाकडे, भूषण फुलझेले, पवन नारायने, तुषार आडे, पवन मंडलिक, ईश्वर हेडाऊ आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

