समुद्रपूर तालुक्यात १५० पेक्षा जास्त खेड्याचा समावेश आहे. समुद्रपुरातून हाइवे ४४ गेला असून या हाइवे वर महिन्याला १० अपघात होत असतात.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- येथील ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेशजी झोटिंग यांच्या नेतृत्वात समुद्रपूर तहसीदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
समुद्रपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने समुद्रपूर तालुक्याला १५० पेक्षा जास्त खेडे गाव असलेला तालुका आहे. तसेच या तालुक्यातील जाम येथून नॅशनल हायवे ४४ गेला असून या हायवेला नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांच्या सिमा जोडल्या गेल्या आहे. या हायवे वर नेहमी महिन्यातून अनेक अपघात होत असतात. त्या अपघात झालेल्या रुग्णांना उपचाराकरीता सेवाग्राम, सावंगी (मेघे) व नागपूर येथे हलवावे लागते. त्यामुळे त्या रुग्णांना रस्त्यातच आपला जीव गमवावा लागतो. जाम ते समुद्रपूर येथील अंतर हे ५ ते ६ किमीचे आहे. त्यामुळे समुद्रपूरला मोठे रुग्णालय असते तर त्यांना प्राथमिक उपचार समुद्रपूर येथेच मिळाला असता. तसेच समुद्रपूर हा तालुका ग्रामिण भागांना जोडला असल्यामुळे येथील नागरीकांना समुद्रपूर येथील ग्रामिण रुग्णालयात डॉक्टरांची योग्य सुविधा नसल्याने व कमी बेड असल्याने तेथे उपचार योग्यरित्या मिळत नाही. त्यामुळे समुद्रपूर येथील ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देण्यात यावा व १०० बेडचे रुग्णालय उपलब्ध करुन देण्यात यावे जेणेकरुन अपघाती रुग्णांचा जीव वाचविता येईल व तालुक्यातील नागरीकांना सोईचे होईल, ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व तालुक्यातील नागरीकांची मागणी करीत आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, संचालक कृ.उ.बा. समिती समुद्रपुर अशोक वांदिले, संचालक कृ.उ.बा. समिती समुद्रपुर गजानन शेंडे, अशोक डगवार, अनिल देशमुख, उपसरपंच मंगेश गिरडे, दौलतराव येलगुंडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुभाष चौधरी, अमोल बोरकर, संचालक कृ.उ.बा. समिती समुद्रपुर गणेश वैरागडे, युवक राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारी सदस्य सौरभ साळवे माजी नगरसेवक रवींद्र झाडे, अनिल आडकीने, प्रा.गोकुल टिपले, प्रमोद गडवार, सुभाष कटमुसरे, दत्तू मुडे, सुरेश भगत, राष्ट्रपाल कांबळे, सुरेश भगत, कैलाश डांगे, कपिल लोहकरे, अनिल चौके, अरुन तुराळे, अब्बास भाई, राहुल वाढई, सुनील चाफले, अंकुश नवघरे, अभिजीत कांबळे, प्रफुल उसरे, सुनील सुपारे, कुशाब चौधरी, संदीप झाडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सोनू मेश्राम, श्रीकृष्णा मुन, गजानन कुमरे, आकाश डंभारे, देवरावजी डंभारे, सुरेश आत्राम, त्रंबक शेंडे, बाबाराव राऊत, रसुलखाँ पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

