देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- येथील यशवंतराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित अहिल्या किड्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला यशवंतराव होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था च्या सचिव सौ. चंद्रकला दिलीप उरकुडे, हिंगणा नगरपंचायत वॉर्ड नंबर च्या नगरसेविका अहिल्या किड्स च्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी शरद उरकुडे, संचालिका सौ सुनीता कंठीराम चतुर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या मूर्ती च्या पूजनाने झाली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामायिक नृत्य सादर केले तसेच दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. त्या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर गोपालकाला वाटून कार्यक्रमचे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वंदना मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित श्री. शरद उरकुडे, सौ. करुणा मॅडम, सौ. दिपाली मॅडम, संकेत उरकुडे पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

