उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक कामगार संघटनेकडून सांगली जिल्हा यांच्या वतीने जालना येथे मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मराठा आरक्षणसाठी चालू असलेल्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली असून त्या बंदला सेवक कामगार संघटने यांच्या वतीने प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी सहमत करून घेऊन संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष उमरफारुक ककमरी यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हात प्रत्येक ठिकाणी आरक्षणासाठी सांगली जिल्हा बंदच्या हाकेला पाठिंबा देण्याचे सांगितले असून झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला व मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असुन झालेल्या लाठीचार्ज या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आहोत तसेच सांगली जिल्हा बंदला सेवक कामगार संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आले त्यावेळेस सांगली जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, सुभान देशमुख, ईस्माईल शेख, अभिषेक छाबरे, शकिल शेख, जकाप्पा सरजे, आमिन शेख, सलमान पठाण, रघुनाथ नागणे, पापा मलमे, आनिल पारसे, ईकबाल पठाण, बबन सरजे, बसु पुजारी, सलिम शेख, मन्सूर शेख, जितेंद्र सरजे आदि उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

