प्रवीण जगताप, प्रतिनिधी
वर्धा:- प्रा. नामदेवरावजी ढुमणे यांचा नुकताच सहकार प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर येथे ३० वर्षे समाधानकारक सेवा देऊन कार्यकाळ पुर्ण करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल गणेश नगर मित्रमंडळातर्फे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हा समारंभ स्थानिक गणेश नगर बोरगाव (मेघे) येथील पुंडलीकरावजी पोराटे यांच्या राहते घरी संपन्न झाला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी राधेश्यामजी पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीपराव भुजाडे, समता सैनिक दल जिल्हा तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सत्कार समारंभाप्रसंगी रघुनाथजी पिंपळकर तसेच दिलीपरावजी भुजाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन पुंडलीकरावजी पोराटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय भगत यांनी मानले.
यावेळी रघुनाथजी पिंपळकर, बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत सदस्या निलीमाताई कटाईत, संजय भगत, दिलीपराव भुजाडे, राधेश्याम पाटील, पुंडलीकरावजी पोराटे, हनुमानजी पिसे, रवींद्र कटाईत, सुनील खोडे, संदीप राऊत, मंदाताई पोराटे आदी गणेश नगर मित्रमंडळातील सदस्यगण उपस्थित होते.