पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०६/०७/२०२३ रात्री २.०० या चे सुमारास टिळक रोडवर एम.पी.एस.सी. चे विदयार्थी हे अभ्यास करून त्यांचे रूमवर जात असताना शक्ती स्पोटस्, टिळक रोड येथे आले असता सदर ठिकाणी काही अज्ञात गुन्हेगारांनी त्यांना अडवून त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण करून तेथून निघून गेल्याने सदर एम. पी. एस. सी. चे विदयार्थीनी सदर बाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे येवून गुन्हा दाखल कला होता. सदर घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ०१ पुणे शहर श्री संदिपसिंह गिल्ल साहेबांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दबडे सो व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री दादा गायकवाड यांना सदर गुन्यांचा तात्काळ तपास करून आरोपी अटक करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दबडे सो व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. दादा गायकवाड यांनी तपास पथकाला सूचना देवून आरोपी तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
सदर आरोपींचा शोध घेत असताना विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना गुप्त बातमीदारावावात माहिती मिळाली की, सदरचे आरोपी हे पानमळा वसाहत, सिंहगड रोड येथील आहे असे कळविल्याने लागलीच सदर बातमी ही त्यांनी वरिष्ठांना सांगितले असता त्यांनी सदर ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन रवाना केले. सदर ठिकाणी पोहचून विश्रामबाग तपास पथकाच्या टीमने गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपींचा शोध घेवून सदरचे आरोपी ताब्यात घेतले.सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांना नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता अनुक्रमे (१) आदित्य ऊर्फ आदि जीवन गायकवाड वय २१ वर्षे रा. सर्व्हे नं. १३१/०१ आम्रपाली बुद्धविहारजवळ, पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे २) साहिल ऊर्फ ब्लॅकी शंकर वाघमारे वय २३ वर्षे रा. सर्व्हे नं. १३१/०१ आम्रपाली बुध्दविहारजवळ पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे ३) अनिकेत ऊर्फ अॅन्डी संग्राम सरोदे वय २३ वर्षे रा. रा. सर्व्हे नं. १३१/०१ आम्रपाली बुध्दविहारजवळ, पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर गुन्हामध्ये वरील आरोपीना अटक करून महिला पोलीस उप-निरीक्षक वर्षाराणी सुतार हे तपास करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार सो मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक साो… मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. पाटील सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे श्री. संदिपसिंह गिल्ल सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे श्री. वसंत कुंवर सो. यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. दादा गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक निरीक्षक, श्री बाळकृष्ण नानेकर, पोलीस अंमलदारहर्षल दुडम, मयूर भोसले, प्रकाश बोरूटे, महावीर बलटे, सागर गोंजारी, आशिष खरात यांच्या पथकाने केली आहे.

