पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर येथे विहंगम योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागपुर इस्कॉन टेंपल येथील सदानंद महाराज गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. या विहेगम योग कार्यक्रम नागरिकांनी आनंदी आणि उत्कृष्ट जीवन कसे जगायचे, तरुण आणि वयस्कर विहगम योग यांचा कसा लाभ मिळणार यावेळी हे सदानंद महाराज यांनी सांगितले.
हा कार्यक्रम राधा कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरचे संस्थापक गोविंद पोदार यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आला होता. गोविंद पोदार हे समृद्ध भारत अभियान शुरू करनारे नागपुरचे पहिले व्यक्ती आहे. यांचा मदत करनारे स्वभावामुळे हजारों नागरिक यांचा या अभियानमध्ये जुळली आहे.
कृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर द्वारा आयोजित या कार्यक्रमात विहंगम योगाच्या विमल ज्ञानावर चर्चा करण्यात आली. विशेष निमंत्रित संत सदानंद महाराज म्हणाले की, विहंगम योगाच्या अभ्यासामुळे जीवनात अभूतपूर्व आनंद आणि शांती मिळते आणि शेवटी जीवनाचा मुख्य उद्देश, जो आत्म्याला वाहतुकीच्या बंधनातून मुक्ती देतो, प्राप्त होतो. विहंगम योग साधल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चारही फळे प्राप्त होतात. सेवा, सत्संग आणि साधना यातून जीवन सफल होऊन आत्मिक शांती मिळू शकते. यावेळी विहंगम योगाच्या तत्त्वांची सविस्तर माहिती दिली. यावी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा 9766445348 / 7385445348

