सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या विसापूर गावमधील जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचे आदेश शिक्षण प्रशासनानी दिला आहे. त्यामुळे विसापूर वासियानी मधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे
आज शासनाने शिक्षणाचं खाजगीकरण करून गरीब विद्ध्यार्थाचे शिक्षण बंद करत आहे. त्याचे भविष्य अंधारमय करत आहे. जे काही सरकारी शाळा आहे त्यामाध्यमातून गरीब विध्यार्थी शिक्षण घेऊन शिक्षित होत आहे पण प्रशासनाने कट करून सरकारी शाळा जिल्हा परीषदच्या शाळा बंद करण्याचे आदेश देत आहे.
सरकारी शाळा बंद करून आज प्रशासन विद्द्यार्थाचे भविष्याचा खेळ मांडला आहे. आज सरकारी शाळा बंद झाल्या तर गरीब शेतकरी मजूर कामगार यांची मुल कशी शिकणार हा मोठ्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा निर्णया विरोधात सर्वांनी आवाज उठवणे आज गरजेचं झाल आहे.
आज सकाळ पासून सोशल मीडियावर एक संदेश वायरल होत आहे. “सर्व विसापूर वासियांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपल्या विसापूर गाव-मधील जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचे आदेश शिक्षण प्रशासन नि दिला आहेत तरी समस्तगावकरी युवा वर्गातील मुलांनी एकत्र येऊन ही शाळा वाचवण्याचा प्रयत्न करावा. गावातील बऱ्याच लोकांना ही शाळा बंद पडल्याने काही फरक पडणार नाही परंतु जर ही शाळा वाचली तर गोरगरिबांची मूल तिथं शिकू शकणार, काही शिक्षणाचं बाजरी करणं होणे सुद्धा थांबणार जर आज आपण ही शाळा वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या विसापूर गावाचे भविष्य अंधारामध्ये जाणार जर ही हायस्कूल बंद झाले तर आणि सर्वांना जास्ती जास्त संख्येने ह्या कामात योगदान, सहभाग देऊन चला आपली जिल्हा परिषद हायस्कूल ला बंद होण्यास वाचवूया”
हा मेसेज सोशल मीडियावर वायरल झाला आहे त्यात सर्व नागरिकांना विसापूर येथील जिल्हा परिषदची शाळा वाचवण्याचे आव्हान करण्यात आले आहे.