मुंबई येथे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी घेतली भेट. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांना आश्वासन.
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट: ०९ सप्टेंबर:- हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेज सरकारने मंजूर करण्यात यावे यासंबंधी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याशी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक सचिव, माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी दुसऱ्यांदा भेट घेऊन मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथे देण्यात यावे असा चर्चा दरम्यान आग्रह धरला असता त्यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊन तुम्हाला न्याय देऊ असे आश्वासन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांना दिले.
वर्धा येथे सावंगी व सेवाग्राम या ठिकाणी दोन वैद्यकीय महाविद्यालय असून हिंगणघाटच्या सभोवतालच्या परिसरात आरोग्य सेवेचा अभाव आहे. हिंगणघाट शहराची लोकवस्ती दीड लाखाच्या वर असून पोहणा,वडनेर, शेकापूर (बाई),कानगाव,अल्लीपूर, सावली वाघ, वाघोली सर्कलचा ग्रामीण भाग जोडला गेलेला आहे. समुद्रपूर तालुक्याचा संपूर्ण ग्रामीण भाग जाम सर्कल, मांडगाव सर्कल, कांडळी सर्कल, गिरड सर्कल, कोरा सर्कल, नंदोरी सर्कलचा परिसर हिंगणघाट शहराला लागून आहे. सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे), हमदापुर सर्कलचा ग्रामीण भाग जवळ आहे.
हिंगणघाट मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार केला असता लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाख आहे. हिंगणघाट शहराला राळेगाव तालुक्यातील आदिवासी भाग, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर-पांढरकवडा, वणी तालुक्याचा संपूर्ण परिसर लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका, चिमूर तालुका हिंगणघाट शहराला लागून आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तहसीलचा संपूर्ण भाग हिंगणघाट शहराला लागू आहे.
हिंगणघाट शहरातून नॅशनल हायवे नं.०७(४४) नागपूर ते हैदराबाद मार्ग कन्याकुमारी रोड जात आहे भौगोलिक दृष्ट्या सर्वांगीण विचार केला असता हिंगणघाट शहराला लागून आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्याचा भाग लागून आहे. वर्धा ते बल्लारशा ते आंध्रप्रदेश रेल्वे मार्ग हिंगणघाट शहरातून जात आहे आंध्रप्रदेशचे ते चंद्रपूर ते नागपूर हायवे जाम चौरस्ता लागून असून हिंगणघाट शहराला लागून आहे. या सर्व बाबी लक्षात आणून दिल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी मेडिकल कॉलेजचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊन न्याय देऊ असे आश्वासनमाजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांना त्यावेळी दिले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
