✒️ अक्षय जाधव सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सातारा:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आलेल्या अजित पवारांचे शिरवळपासून कराडपर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी समर्थक जमले होते.
मात्र, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यात हवा तसा उत्साह दिसून आला नाही. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी भाषण करणे टाळले आणि ते सरळ निघून गेले. एकंदरीतच कराडमध्ये अजितदादांचा ‘फ्लॉप शो’ झाला.
राष्ट्रवादीतील बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री होऊन अजित पवार पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. स्वागताचे बॅनर झळकले होते. त्यामुळे या दौऱ्याची मोठी उत्सुकता होती. मात्र, अजित पवार यांच्या या दौऱ्यात म्हणावी तेवढी गर्दी दिसली नाही. शिवाय गर्दीमध्ये उत्साह देखील दिसून आला नाही. किरकोळ घोषणाबाजी झाली आणि पत्रकारांशी संवाद साधून अजितदादा थेट इस्लामपूरकडे रवाना झाले.
अजितदादा कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर येथील बाहेरील पारालगत उभारण्यात आलेल्या स्टेजवरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. त्यासाठी या ठिकाणी एक स्टेज देखील उभारण्यात आले होते. मात्र, कार्यकर्त्याची कमी संख्या पाहता उपमुख्यमंत्री पवारांनी आपला कार्यक्रम बदलला. दिवंगत चव्हान यांच्या समाधिस अभिवादन केल्यानंतर ते थेट गाडीतच जाऊन बसले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348