मंगेश जगताप, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पतीने आपल्या मुलाची संगममत करून आपल्या पत्नीवर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात एका 32 वर्षीय विवाहित महिला बरोबर हैवाणीयतची सीमा पार करून तिच्या पती आणि सावत्र मुलींनी सलग तीन महिन्यापासून सामूहिक अत्याचार करत होते. हे नराधम या पीडित महिलेला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होता. एवंढ नाही तर त्या नराधमाने या महिलेचे अश्लील व्हिडीओ बनवून ते व्हिडिओ ऑनलाईन पॉर्न वेबसाइटवर अपलोड केले.
प्राप्त माहितीनुसार पीडित महिला 32 वर्षाची आहे. या महिलेच पहिल लग्न मोडलं होतं. तिने 2010 मध्ये घरगुती हिंसाचारामुळे आपल्या पहिला पतीला सोडून त्याला घटस्फोट दिला होता. तिला पहिला पतीपासून दोन मुलं होती. एकाच वय 8 तर दुसऱ्याचं वय 10 वर्ष असं होतं.
पहिला पतीपासून घटस्फोट घेतला नंतर पाच वर्षांनी म्हणजे 2015 मध्ये पीडित महिलेची नराधम आरोपी वय 40 वर्ष याच्याशी ओळख झाली. त्यांच्यामध्ये प्रेम झालं आणि त्यांनी मग लग्न केलं. आरोपीला पहिल्या पत्नीचे दोन मुलं होती. एकाच वय 20 आणि दुसऱ्याच वय 22 वर्ष असं आहे. सावत्र मुलांसह ती दुसऱ्या नवऱ्यासह ट्रॉम्बेमधील चीता कॅम्प परिसरात राहत होती.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, आरोपीनं 22 जूनला तिला गुंगीचं औषध असलेले शीतपेय दिलं. ते प्यायलानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी पतीने आपल्या दोन मुलांनाही दारू पाजली आणि पीडितेवर सामुहिक बलात्कार केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो नराधम एवढ्यावरच नाही थांबला त्याने या सगळ्या अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ त्याने ऑनलाईन पॉर्न वेबसाइटवर अपलोड केला.
पीडितीला आरोपीच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ दिसल्यानंतर सगळ्या प्रकार समोर आला. तिने शुक्रवारी 1 सप्टेंबर पहाटे 2 वाजता आपल्या भावासह पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर नवरा आणि दोन सावत्र मुलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात तिघांविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी माहिती दिली की, तिन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना सायन कोळीवाडा परिसरातून पकडण्यात आले. मुख्य आरोपीच्या फोनची तपासणी केल्यास धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या नराधमाच्या मोबाइलमध्ये पत्नीचे सुमारे 700 पॉर्न व्हिडीओ होते. पोलिसांनी नराधमाची कसून चौकशी केल्यावर पत्नीच्या बलात्काराचे दोन व्हिडीओ त्यांनी पॉर्न साइटवर अपलोड केल्याची कबुली पोलिसांना दिली.

