आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा:- 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील देवळी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन नातवाने पैशांसाठी आपल्याच आजोबाची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देवळी तालुका हादरला आहे. वृद्धाचा हत्येचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी अल्पवयीन नातू तसेच महेश गजानन कोडापे वय 18 व हर्षद दिलीप पराडकर वय 20 यांना अटक करण्यात आली असून ते वर्धा येथील रहिवासी आहे.
65 वर्षीय अरुण डहाके यांचा डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होता. ही हत्या चोरी की वैमनस्य अशी शंका उपस्थित झाल्याने पोलिसाना तपास करण्यात मोठे आव्हान ठरले होते. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून या हत्याकांडाचा महत्वपूर्ण तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
आईच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याची नातवास माहिती मिळाली. ते चोरण्यासाठी त्याने कट रचला. मित्रांसह मिळून त्याने रात्री गिरोली गाठले. पैसे चोरून पळून जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र घरात घुसल्यावर आजोबांना जाग आली. त्यामुळे आरोपी घाबरले. तेव्हा खून करण्याचा निर्णय घेतला, अशी कबुली त्यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हा शाखेने आरोपींचा छडा लावला.

