डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी : – ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील व्यावसायिकांना गंडा घालणारी बंटी व बबली जोडी पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट -४ च्या जाळ्यात सापडले आहे.
पेमेंटचे ऑनलाइन ट्रांजेक्शन सक्सेसफुल झाले असे दाखवून शहरातील ३०० ते ४०० छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गंडा घातला असल्याची बाब पोलीस तापासात समोर आली आहे. गेली दोन ते तीन वर्षापासून बंटी आणि बबलीचा प्रताप हा सुरू होता. त्यामुळे व्यवसायिकांनी आपल्या खात्यावर ग्राहकाने पेमेंट जमा केले जमा केले आहे का. याबाबत प्रथम खात्री करावी आणि नंतर मालाची विक्री करावी असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.
१) गणेश शंकर बोरसे (वय ३४ वर्ष, रा.काकडे यांची रूम पठारे वस्ती, लोहगाव, पुणे) आणि त्याची पत्नी २) प्रिया गणेश बोरसे (वय २८ वर्षे, रा.सदर ठिकाणी) असे अटक केलेल्या बंटी आणि बबली यांची नावे आहेत. या प्रकरणी कपड्याचे व्यापारी दिलीप कुमार माली (रा.राहटणी ,पुणे) यांनी तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहटनीतील एका कपड्याच्या व्यापारी यांनी शुक्रवार (ता.८) रोजी पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये म्हटले होते की एक महिला व पुरुष दुकानातील कपडे खरेदी केले आणि ऑनलाईन पेमेंट केले पेमेंट सक्सेसफुल झाले असल्याचा स्क्रीन शॉट देखील दुकानदाराला दाखविला मात्र, पेमेंट जमा झाले नाही. आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार व्यापारी दिलीप माली यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे केली.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट -४ च्या पथकाने सुरू केला. सदर इसम हे दुकानांमध्ये कधी जोडीने तर कधी दोन मुलांना सोबत घेऊन खरेदी करण्यासाठी जात असत. दुकानदाराशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करीत होते. काही दुकानदारांकडून खर्चासाठी रोख रक्कम देखील घेत होते. खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केले जायचे पेमेंट सक्सेसफुल झाले असल्याचा स्क्रीनशॉट घेऊया आपण दाखवत होते व्यापारांना ते सांगत असत की एनईएफटी द्वारे केलेले पेमेंट २४ तासाच्या आत जमा होते जर पेमेंट जमा झाले नाही तर तो स्वतःचा मोबाईल नंबर दुकानदारांना देत होता त्यामुळे दुकानदाराला विश्वास बसायचा याकरिता तो त्याच्या मोबाईल फोनवर मिस कॉल देण्यास सांगत असे नंतर सामान घेऊन तो बाहेर गेल्यावर त्या दुकानदाराचा मोबाईल फोन ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून सिमकार्ड काढून ठेवत असे. दुसऱ्या दुकानात जाताना पुन्हा तो सिम्बॉल मोबाईल मध्ये टाकायचा अशाप्रकारे हे दोघे व्यापाऱ्यांना गंडा घालत होते मात्र गुन्हे शाखा युनिट -४च्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोठ्या शिताफीने या बंटी बबली ला ताब्यात घेतले आहे. या आरोपीवर वाकड ०२, सांगवी ०१, भोसरी ०१ रावेत ०१, भोसरी एमआयडीसी ०१ आदी पोलीस ठाण्यात या बंटी बबली यांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ४० वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर सहाय्यक उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, आदिनाथ मिसाळ, आबासाहेब गिरनाळे, हवलदार प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस, नदाफ रोहिदास आडे, पोलीस नाईक वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जयभाये, पोलीस शिपाई प्रशांत सईद, सुखदेव गावंडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानबंद, हवलदार गणेश माळी, शिपाई नितेश बिचेवार,हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348