रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील सावरगाव बु. येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या नावाने गावातील नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांत संताप दिसून येते आहे.
सावरगाव बु. ग्रामपंचायत मध्ये दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी 10:30 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील रमाई आवास योजना संदर्भात ग्रामसभा बोलावण्यात आली होती, परंतु ग्रामसभेमध्ये लाभधारकांचे कच्चे नावे रजिस्टरवर ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगममताने घेण्यात आले परंतु कुठल्याही प्रकारे ग्रामसभा प्रोसिडींग वर घेण्यात आले नाही व सदरील ग्रामसभेत जे नावे कच्चा रजिस्टरवर घेतले होते तीच नावे प्रोसिडींग वर घ्यायला हवे होते परंतु ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी संबंधित नावे वगळून घर बसल्या लाभधारकांचे नावे घेऊन ठराव पास केला आहे. तरी संबंधित ठरवाची शहानिशा करून परस्पर घेतलेला ठराव रद्द करण्यात यावा अशी मागणी सावरगाव बु येथील नागरिक यांनी अर्जाद्वारे गटविकास अधिकारी यांना केली.
सदरील निवेदनात राजेभाऊ वक्ते, दिपक वक्ते, चंद्रकांत वक्ते, श्रीमंत वक्ते, माणिक रंजवे व बाबासाहेब डोंगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदरील ठरावावा बाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती परतूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी चौकसी करून सदरील ठरावं रद्द करण्यात यावा व योग्य ते ग्रामसभेत पुनर्व ग्रामसभा घेऊन योग्य ते लाभधारक निवडण्यात यावे असे मत व्यक्त केले जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

