Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 13, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट ०४, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने युनिट-०४ कडील पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अजय गायकवाड व सारस साळवी यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की साईबाबा मंदीर, जुना पुणे-मुंबई हायवे रोडवर बोपोडी मेट्रो स्टेशन जवळ तीन इसम चोरी केलेले मोबाईल कमी किंमतीत विकत आहेत.सदर बातमीचे अनुशंगाने पथकाने बातमीच्या ठिकाणी जावून त्यांना पकडले असता त्यांचेकडे एक स्कुटर मिळून आली. सदर स्कुटरची झडती घेता, त्याचे डिकी मध्ये वेग-वेगळ्या कंपनीचे एकुण १२ मोबाईल फोन व ०१ चाकु मिळून आला. त्यांना त्यांची नावे व पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) किशोर उत्तम गायकवाड २) अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर ३) आशिष ऊर्फ बोना संतोष सोजवळ असे असल्याचेसांगितले. त्यांचेकडे सदरबाबत चौकशी करता, त्यांनी सदरचे मोबाईल पुणे व पिंपरी-चिंचवड भागात तसेच पुणे-बेंगलोर हायवेवर रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या लोकांना चाकुचा धाक दाखवून, त्यांचेकडून जबरदस्तीनेहिसकावुन चोरी केल्याचे सांगितले.तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी करता, त्यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार हे हॅरिस ब्रिज जवळ बोपोडी येथे थांबलेले असून त्यांचेकडे देखील काही चोरीचे मोबाईल फोन आहेत असे सांगितलेने सदर आरोपींना त्यांचेकडील मिळालेल्या मोबाईल फोन व स्कुटरसह हॅरिस ब्रिजजवळ बोपोडी येथे गेले असता तेथे त्यांचे दोन साथीदार नामे ४) जॉर्ज डॉनिक डिसोजा ५) साहील ऊर्फ साहील्या सलीम शेख असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात वेग-वेगळ्या कंपनीचे ०८ मोबाईल फोन मिळुन आले. तसेच त्यांचे ताब्यात एक मोटार सायकल मिळुन आली. सदर दोन्ही वाहनाचा उपयोग ते रात्री एकटे जाणा-या लोकांना अडवून त्यांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन चो-या करण्यासाठी करत असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेले आरोपी १ ) किशोर उत्तम गायकवाड, वय- १९ वर्षे, रा. स.नं. २४. कमलाबाई बहीरट चाळ, बोपोडी, पुणे २) अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर, वय २१ वर्षे, रा. स.नं.२४, बोपोडी पुणे ३) आषिश ऊर्फ बोना संतोष सोजवळ, वय २४ वर्षे, रा. स.नं. २४. सावंत नगरीजवळ, बोपोडी पुणे ४) जॉर्ज डॉम्निक डिसोजा, वय- १९ वर्षे, रा. स.नं. २४, सम्राट अशोक नगर, पवळे चाळ, बोपोडी, पुणे ५) साहील ऊर्फ साहील्या सलीम शेख, वय- १९ वर्षे, रा. इंदीरानगर वसाहत, घर नं. २, खडकी बाजार, खडकी, पुणे यांचेकडून एकुण २० मोबाईल फोन, ०१ धारदार चाकु तसेच गुन्हयात वापरलेली ०१ अॅक्टिव्हा स्कुटर, ०१ बजाज पल्सर गाडी असा एकुण रु. ४,१५,२०० /- किचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिल नमुद आरोपींकडून आतापर्यंत खालीलप्रमाणे जबरी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे.

१) खडकी पोलीस ठाणे गुरनं ३३८ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ५०६, ३४ ३९२, ३४ २) खडकी पोलीस ठाणे गुरनं. ३३५ / २०२३ भा.द.वि. कलम ३)खडकी पोलीस ठाणे गुरनं ३३६ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ ४) सांगवीपोलीस ठाणे गुरनं. ४८६/२०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ ५)सांगवी पोलीस ठाणे गुरनं.४८८ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ ६)चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गुरनं. ६०६ / २०२३ मा.द.वि. कलम ३९२, ३४ ७)चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गुरनं .६३७/२०२३ भा.द.वि. कलम ४५७,३८० ३४ ८) चतुःशृंगी पोलीस ठाणे गुरनं. ६३८ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ ९)स्वारगेट पोलीस ठाणे गुरन. २३८ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ १०) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुरन ४३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ ११) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं. १०६४ / २०२३ भा. दं. वि. कलम ३९२.३४ १२) भारती विद्यापिठ पोलीस ठाणे गुरन ५७९ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४

वरिल आरोपींकडून एकुण ११ मोबाईल जबरी चोरीचे व ०१ घरफोडी असे एकुण १२ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २, श्री. रातीश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री गणेश माने यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक, जयदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक महेंद्र पवार, पोलीस अंमलदार, अजय गायकवाड, हरीष मोरे, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, पोलीस नाईक सारस साळवी, नागेशसिंग कुँवर, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, अशोक शेलार, अमोल वाडकर, रमेश राठोड, महीला पोलीस अंमलदार, वैशाली माकड़ी, चालक सहा. पो. फौज शितल शिंदे यांनी केली आहे..

Previous Post

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेले ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचे अंमली पदार्थ राजणगांव येथील एम ई पी एल कंपनीचे भटटीमध्ये नाश….

Next Post

वर्धा जिल्हाधिकारी यांनी घेतली सर्पदंशाच्या निवेदनाची दखल, सर्पदंशाच्या उपचारा संदर्भात तज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा येत्या पंधरवाड्यात घेणार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वर्धा जिल्हाधिकारी यांनी घेतली सर्पदंशाच्या निवेदनाची दखल, सर्पदंशाच्या उपचारा संदर्भात तज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा येत्या पंधरवाड्यात घेणार.

वर्धा जिल्हाधिकारी यांनी घेतली सर्पदंशाच्या निवेदनाची दखल, सर्पदंशाच्या उपचारा संदर्भात तज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा येत्या पंधरवाड्यात घेणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In