आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा क्षेत्राचे भारत राष्ट्र समितीचे धडाडीचे नेते डाॅ. उमेश वावरे (वैज्ञानिक) याच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील संरपच व उपसंरपच चे एक शिष्टमंडळ तेंलगणा
राज्यामध्ये अभ्यास दौराकरण्या करीता गेले.
यावेळी तेंलगणा राज्याचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या हस्ते मान सन्मान व पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसरा दिवशी तेंलगणातील पोजेक्ट पाहाणी दौरा झाला.स्थानिक नेते कार्यकर्ते सोबत तेंलगणा राज्या मध्ये भव्य दिव्य कालेश्वरम धरण दाखविण्यात आले. हे धरण देश्याचे एक मोठे धरण असुन ते संपूर्ण अडर ग्राउंड आहे. हया धरणाच्या व्याप एवढा असून ते दोन तिन नदी पात्राचे मध्यस्थ साधून बाधण्यात आले. या धरणाच्या जल साठा याप्रमाणात आहे हया धरणाचे वैशिष्ट म्हणजे ठराविक वेळस हे धरण पूर्णत्वात आले हयामुळे याला लागणारा पैसा व श्रम कमी लागले. या एका धरणामुळे एकुण 33 जिल्हाना पिण्याचा पाण्याचे तसेच शेती करीता लागणारे सिंचन सुविधाचा फायदा झाला. हया धरणातून कॅनल न टाकता प्रत्येक गावा शहरापर्यंत या पाण्याचा पुरवठा केला जातो त्यामुळे पाण्याचा एकाही थेंबाचे नुकसान होत नाही व संपूर्ण पाणी वापरता येते तसेच पिण्या करीता शुध्द पाण्याची सोय सुद्धा या पाईप लाईन व्दारे केली जाते. त्यामुळे या संपूर्ण तेंलगणा राज्याचा चेहरा मोहरा बदलेला दिसून येत आहे.
त्यानंतर महिला व युवका बाबत माहिती देण्यात आली. तेंलगणा राज्य हे विधवा महिला हयाना 3100 प्रत्येक महिन्या राषी देवून त्याचे जिवन मान उचावत आहे. तसेच बेरोजगार तरूण जे दलित पिडीत आहेत त्याना 10 लाख रूपये देवून रोजगाराचे नविन दालन उभे केले हया 10 लाख मध्ये युवक बेरोजगाना बॅकेचे खेटर खाण्याची किवा चकरा मारण्याची गरज नाही थेट सरकार त्यांना पैसा पुरवठा करतो आणि विशेष म्हणजे हया 10 लाखात युवकाना कोणत्याही व कितीही उघोग करण्याची सवलत देण्यात आली आहे हे विशेष.
तसेच शेतकरी बांधवाना हेक्टरी 10 हजार ची रक्कम लागवड करण्या करीता प्रत्येक शेतकऱ्यास तेंलगणा सरकार देत असुन ही रक्कम नंतरच्या काळात शेतकरास परत करण्याची गरज नाही व बॅकेचे चकरा मारण्याची आवश्यकता नाही त्यामुळे येथील शेतकरी खुशाल व समृद्ध आहे. तसेच संपूर्ण परीसर हिरवागार दिसून येतो. हे सर्व तेंलगणा सरकारला कमी दिवसात साध्य करता आले परंतु आज आपल्या महाराष्ट्र राज्या मध्ये सर्व सोई उपलब्ध असुन आपण हे आज पर्यंत करू शकलो नाही हि खंत आहे. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक मानसाच्या मनात आहे. जर हे सर्व साध्य करण्याचे असेल तर हे सर्व आपल्या महाराष्ट्र मध्ये शक्य आहे तेव्हाच आपण सुजलाम सुफलाम होऊ शकतो. यावेळी डाॅ उमेश वावरे यांचा विनतीस मान दवून तेंलगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी त्यांचे धैय वाढविले तसेच महाराष्ट्रातील शेतकराचे आभार मानले.

