पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- खंडणी विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदार गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोना शंकर संपते यांना माहिती मिळाली की वैभव भास्कर पोखरे यांची आई मीनाक्षी पोखरे व मनीषा पवार यांना कुख्यात गुंड बाबुलाल मोहोळ व त्याचे साथीदारांनीं महिला नामे मीनाक्षी पोखरे व मनीषा पवार यांनी पुणे स्टेशन येथिल स्टॅाल मिळवून दिले नाहित म्हणून 6 लाखाचा तोटा झाला असे सांगून अपहरण करून डांबून ठेवून त्यांना मारहाण करत असून आरोपींनीं वैभव भास्कर पोखरे यांच्या आई ला जीवे मारण्याची धमकी देऊन 17 लाख रुपये ची खंडणी ची मागणी केली होती, प्राप्त माहिती वरुन कारवाई करणे कामी खंडणी विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदारांनी माहितीचे विश्लेषण करून उत्तमनगर येथून नमूद महिलांनां डांबून ठेवलेले ठिकाणचा शोध घेऊन इसम नामे 1) बाबुलाल लक्ष्मण मोहोळ वय 45,वर्षे सरडे बाग उत्तमनगर पुणे 2) अमर नंदकुमार मोहिते वय 39 वर्षे गणेश नगर पुणे 3) प्रदीप प्रभाकर नलवडे,38 ,भूगाव ,पुणे4)अक्षय मारूती फड,24 रा. वारजे यांना ताब्यात घेऊन नमूद महिलांचीं सुटका केली. नमूद बाबत उत्तमनगर पो स्टे येथे ipc 364(अ), 385, 387,341 323 504 506,34 नुसार गुन्हा दाखल करणेची कार्यवाही करीत आहोत… नमूद आरोपी क्र. 1) बाबुलाल लक्ष्मण मोहोळ वय 45,वर्षे सरडे बाग उत्तमनगर पुणे याचेवर 10 गुन्हे नोंद आहेत2) अमर नंदकुमार मोहिते वय 39 वर्षे गणेश नगर पुणे याचेवर 5 गुन्हे नोंद आहेत.3)आरोपी क्र. 3) प्रदीप प्रभाकर नलवडे याचेवर 2 गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सर , मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री.सतीश गोवेकर सर ,यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2गुन्हे शाखा चे पोनि प्रताप मानकर, पोउपनि श्रीकांत चव्हाण,सहा फौ विजय गुरव, पोलीस अमंलदार प्रदिप शितोळ , विनोद साळुंखे , सुरेंद्र जगदाळे , राहुल उत्तरकर, शंकर संपते , संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर यांनी केली आहे.

