मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम खांदला येथील स्थानिक रहिवासी स्व,बाबुराव दुर्गे वय-40 वर्षे हे दिर्ग आजाराने ग्रस्त होते त्यांना अनेक दवाखान्यात दाखल करून उपचार सुध्दा करण्यात आले. परंतु पाहिजे तितका आराम झाले नाही. कुटूंबातील सदस्यांनी त्यांना घरीच ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवला. पण दिवसेंदिवस आजारात कुठलीही समाधानकारक सुधारणा झाली नाही. शेवटी ते बाबुराव दुर्गे आजारातच काही दिवसा आदी त्यांच्या मृत्यु झाला. त्यांच्या नंतर परिवारात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. त्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
ही बाब कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले कार्यकर्ते पोशालू सुधरी व विकास तोडसाम यांना पाठवून स्वर्गीय बाबुराव दुर्गे यांच्या कुटूंबाला मदतीचा हात देण्याकरिता सांगितले. आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाबुराव यांच्या पत्नी रंजना बाबुराव दुर्गे यांना ५०००/- रुपयेचे आर्थिक मदत देण्यात आले. यानंतर पण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिले.
त्यावेळी विकास तोडसाम, पोशालू सूधरी, रवी पंजलवार, यशवंत कन्नाके, शंकर सिडाम, विनोद सिडाम, संतोष तोर्रेम, मोनेश मोतकुरवार, धर्मा आत्राम, राकेश तलांडे, रुपेश पोरतेट, महादेव आलाम, व्यंकटेश मडावी, बाबुराव चापले, नितेश सिडाम, तसेच गावकरी व स्वर्गीय बाबुराव दुर्गे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

