संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य कडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विपिन इटनकर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडण्यास निवेदन देण्यात आले.
निवेदनात संताजी ब्रिगेड तेली समाज च्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, सध्याच्या आरक्षण टक्केवारी ची परिस्थिती बघता मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देणे मराठा समाजाची ही मागणी ही मागणी ओबीसी समाजावर अन्यायकारक असल्याचे लक्षात येते.
मंडल आयोगाच्या सूचनेनुसार ओबीसी समाजाला सरसकट २७% टक्के आरक्षण मिळायला पाहिजे होते परंतु त्या २७% पैकी इतर प्रवर्गातील घटकांना तरतूद केल्यामुळे आज घडीला ते फक्त १७ % टक्के एवढे आहे. त्या १७ % टक्क्यात ४०० च्या वर जाती, पोटजाती आहेत.
त्या १७% टक्क्यांत शासनाने जर मराठा समाजाला समाविष्ट केल्यास व्यावहारिकदृष्ट्या कुठल्याही समाजाला त्याचा फायदा होणार नाही.
संस्थेचे संस्थापक सचिव अजय धोपटे म्हणाले की, तेली समाज सर्व शाखा व पोटजाती मिळून भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १०% एवढी आहे. तरी तेली म्हणून आमच्या वाट्याला काय येत असेल याचा विचार करावा.
तसेच संस्थेचे सह-सचिव हितेश बावनकुळे म्हणाले की, तामिळनाडू राज्यात असलेले ६९%आरक्षण ची आठवण सुद्धा करून देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने सुद्धा जसे तामिळनाडू राज्याच्या विधान सभेने १९ जुलै १९९४ रोजी विधान सभेत एकमताने प्रस्ताव पारित करुन ६९% आरक्षणाचा कायदा केन्द्र सरकारकडे पाठविला, त्याच धर्तीवर त्याच सारखा कायदा महाराष्ट्र सरकारने केन्द्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित आहे. तसेच हा कायदा घटना दुरूस्ती करून, राज्य घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये टाकण्याची मागणी आमची आहे. कारण राज्य घटनेतील कलम ३१(क) नूसार ९ व्या परिशिष्टात समावेश केलेल्या संसदेच्या कायद्यांना न्यायालयात दाद मागता येत नाही. हे विशेष.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. परंतु मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्यात येवू नये आणि जर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास शासनाने आमचा कोटा कमी न करता ओबीसी चा कोटा २७% वरून वाढवून देण्यात यावा किंवा त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करून त्यातून आरक्षण देण्यात यावे. ही आमची मागणी आहे.
तरी आपणास नम्र विनंती आहे की, आमच्या वरील मागणी वर योग्य ती कार्यवाही करून ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या तेली समाजावर भविष्यात होणाऱ्या अन्याया पासून आम्हास वाचवावे. अशी विनंती केली.संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा संस्थेचे अजय भाऊ धोपटे संस्थापक, विजयजी हटवार अध्यक्ष, महेंद्र भुरे उपाध्यक्ष, हितेश बावनकुळे सहसचिव, गजानन तळवेकर, संघटक प्रमुख महाराष्ट्र प्रदेश, मंगेश साखरकर, सहसंघटक प्रमुख महाराष्ट्र प्रदेश, लोकनाथ भुरे, अध्यक्ष विदर्भ, श्रीराम हटवार उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण, महादेव गोडमारे, उपाध्यक्ष नागपूर शहर, सुरेश धोपटे महासचिव नागपूर शहर, अनिल पडोळे उपाध्यक्ष नागपूर शहर, राजेश हटवार सहसचिव नागपूर शहर, कुमार बावनकर उपाध्यक्ष नागपूर शहर, संजय बडवाईक अध्यक्ष दक्षिण विभाग, शैलेश आंबोलीकर अध्यक्ष दक्षिण पश्चिम विभाग, देवेन बारई, अध्यक्ष पूर्व नागपूर, अजय कांबळे मीडिया प्रभारी, विठ्ठल जी तडस सलागार, महादेव काका थोपटे सल्लागार भास्कर जी चापले, सलागार, मोहन बारई,राजु नागपूरे, युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

