पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भीक मागण्यासाठी चक्क पोटच्याच चार वर्षांच्या मुलीला आई- वडिलांनी केवळ दोन हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिचा ताबा असलेल्या एका दाम्पत्याला अटक केली. मरिआई देववाले समाजातील १० पंचांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या समाजातील काही तरुणांनी या व्यवहाराला विरोध दर्शविला; परंतु पंचांनी त्यांना कोणी विरोध केला व पोलिसांकडे गेला तर जातीबाहेर काढू, असा निर्णय जात पंचायतीने दिल्यानेटी समोर आले.
याबाबत अॅड. शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदुवाडी, हडपसर) व ॲड. शैलेश बेरे पाटील यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनिल जाधव आणि लक्ष्मी अनिल जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे वकील असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्याची माहिती दिली. एक महिला गेल्या २ महिन्यांपासून कल्याणीनगर, विमाननगर या भागात चार ते पाच वर्षांच्या मुलीला घेऊन भीक मागताना • दिसून येते. भीक मिळाली नाही तर तिला मारहाण करते.अधिक माहिती घेतली असता नगरमधील एका दाम्पत्याला सहा मुली आहेत. त्यांच्याकडून या तिघांनी समाजातील पंचांच्या सहमतीने दोन हजार रुपयांना विकत घेतली. त्यासाठी जातपंचायतीने पैसे घेतल्याची माहिती मिळाली. समाजातील चौघा जणांनी त्या मुलीला विकत घेऊ नये, यासाठी विरोध केला; परंतु समाजातील १० पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्याला मान्यता दिली. विरोध करणाऱ्यांना जातीबाहेर काढू, असा जातपंचायतीने निर्णय दिला.
फिर्यादींना ही बाब समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.दरम्यान, आपण या मुलीला दत्तक घेतल्याचा दावा या मुलीचा ताबा असलेल्या दाम्पत्याने केला आहे. उपनिरीक्षक नांगरे अधिक तपास करीत आहेत.
