पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- प्रेम प्रकरणातून अपहरण झालेल्या एका तरुणाला वानवडी मार्शल व तपास पथकाच्या सर्तकतेमुळे जिवनदान मिळाले आहे. रामटेकडी ससाणेनगर अंडरपास कॅनाल जवळ सदर घटना घडली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, लग्न झालेल्या मुलीला भेटायला आलेल्या तरुणाला मुलीच्या नातेवाईंकानी पाहिल्यानंतर रागाच्या भरात मुलीचे वडील व इतर यांनी सदर तरुणाला हडपसर परिसरातून रिक्षात डांबून अपहरण केले. यानंतर ससाणेनगर अंडरपास येथील कॅनॉल जवळ अपहृत तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. यावेळी गस्तीवर असलेल्या मार्शलला सदर प्रकार लक्षात येताच तपास पथकाने कारवाई करत तरुणाचे जीव वाचवले.
यावेळी भाऊसाहेब पटारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलिस स्टेशन यांनी तात्काळ कारवाईसाठी तपास पथकाला धाडले होते. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी संतोष सोनवणे पोलीस उपनिरीक्षक वानवडी पोलिस स्टेशन यांनी घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतले.
वानवडी पोलीस ठाण्यात याबाबत प्राथमिक गुन्हा नोंद करण्यात आला असून अटक आरोपींना पुढील तपासकामी हडपसर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
