पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०१/०९/२०२३ रोजी रात्री ०९.०० वा ते दिनांक ०२/०९/२०२३ रोजीचे सकाळी १०.०० वा थे दरम्यान फिर्यादी नामे विजय अरुण यंदे, वय ४९ वर्षे धंदा गॅरेज, रा. कल्प कल्याण हौसिंग सोसायटी, सव्हे नंबर ६७२/४ बिल्डींग नंबर ३, फ्लॅट नंबर ४९ बिबवेवाडी, पुणे यांचे संतोषनगर लेन नंबर ७, डिलाईट बेकरीच्या शेजारी बिजल लक्ष्मी मोटर्स या गॅरेजच्या कपांऊंन्डमधुन ट्रक क्रमांक एम.एच.१२.पी.क्यु.८११४ यामधील दोन टन्या कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी केल्या आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिन ५७६ / २०२३ भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे..
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत मिक्सर, ट्रक व बस मधील बॅटऱ्या चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार है वर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, अभिनय चौधरी यांना सदरचा गुन्हा तुषार संजय धनावडे वय २७ वर्षे, रा. मुळ भिलारेवाडी, ग्रामपंचायत ऑफिस समोर, ता. हवेली, जि. पुणे सध्या रा. फ्लॅट नंबर १६, ४ था मजला, शारदा निकेतन सोसायटी, बेनकर वस्ती, धायरी, पुणे या इसमाने केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीताचा शोध घेतला असता तो भिलारेवाडी, चामुंडा माता मंदीराचे समोरील रोडवर मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५७६ / २०२३ भादंवि कलम ३८० या गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे.
आरोपी तुषार संजय धनावडे याचेकडे अटके दरम्यान तपास केला असता त्याने मागील दोन वर्षापासून कात्रज, भिलारेवाडी, मांगडेवाडी भागातील मिक्सर, ट्रक, बसच्या बॅटऱ्या रात्रीच्या वेळी चोरी केल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन एकुण १,७५,०००/- रुपयांचा १३ महागड्या बॅटन्या जप्त करण्यात आल्या असून आरोपीताकडुन खालील प्रमाणे एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
१. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५७६ / २०२३ भादवि कलम ३७९
२. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५७४ / २०२३ भादवि कलम ३७९
३. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४७/२०२३ भादवि कलम ३७९ ४. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८६/२०२३ भादंवि कलम ३७९
५. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ९० / २०२३ भादंवि कलम ३७९
६. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७२१/२०२१ भादंवि कलम ३७९
७. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४६८ / २०२२ भादंवि कलम ३७९
८. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६८९ / २०२२, भादंवि कलम ३७९
सदरची कामगिरी मा. रितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णिक सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, शैलेश साठे, मंगेश पवार, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

