प्रशांत जगताप, मुख्यसंपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथील प्रसिध्द चित्रपट कॉस्च्युम डिझायनर सुप्रिया ढोके यांनी स्वतःचा वाढदिवस दिव्यांग मुलानं बरोबर साजरा केला. यावेळी या दिव्यांग चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे यातून पाहायला मिळाले.
सुप्रिया ढोके या प्रसिध्द चित्रपट कॉस्च्युम डिझायनर आहेत त्यांनी अनेक चित्रपट कॉस्च्युम डिझाईन केलं आहे. त्यांनी यशवंत या मराठी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आणि स्मिता तांबे यांच्या बरोबर काम केलं आहे. त्यावेळी मकरंद अनासपुरे व स्मिता तांबे यांनी त्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले होते.तसेच त्या एक फॅशन डिझायनर देखील असून त्यांनी दिव्यांग मॉडेल्स साठी हि ड्रेसेस डिझाईन केले आहे.त्यांनी नुकत्याच एका फॅशन शो ला दिव्यांग मॉडेल प्रगती येसनसुरे हिच्या करिता ड्रेस डिझाईन केले असून प्रगती ने हि त्यात पहिले पारितोषिक पटकावले आहे.
सुप्रिया ढोके यांच्या जन्मदिनी नागपुर शहरातील झासी राणी चौक येथील स्नेहांगण दिव्यांग शाळा तसेच वसतिगृहातील मुलांन बरोबर त्यांनी आपला वाढदिवस केक कापून त्यानंतर या सर्व दिव्यांग मुलांना गोड जेवणाचा आस्वाद दिला. तसेच त्यांच्या सोबत आनंदउत्सव साजरा केला त्यावेळी या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

त्यावेळी सुप्रिया ढोके म्हणाल्या की, मोठं मोठे केक कापून, बॅनर बाजी करून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने आपला वाढदिवस या अनाथ, दिव्यांग, गरीब बालकांन सोबत साजरा करावा. आपण त्यांना दिलेला सुखाचा एक घास त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो.
आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ, दिव्यांग मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्या मुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात दिव्यांग व अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन त्यांच्या नशिबी अपंगत्व येऊनही नेहमी चेहऱ्यावर आनंद घेऊन जगणारे समाजातील अशा दिव्यांग समूहाला सर्वसामान्याप्रमाणेच जगण्याची एक नवी दिशा देऊन त्याचं दुःख कमी करणं हा उद्देश अंगी बाळगून म्हणुन दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहे. सुप्रिया म्हणतात कि जीवन जगणं हि कला आहे आणि ह्याच सुंदर उदाहरण म्हणजे हा दिव्यांग समूह आहे.तेव्हा कुठलं हि दुःख जर आपलं मनोबल घालवत असेल तर अजिबात खचून न जाता या वस्तीगृहाला आणि शाळेला नक्कीच भेट देऊन बघा खरं जगणं आणि तेही आपल्या आजारावर ही मात करत कसे आनंद चेहेऱ्यावर आणायचा असतो आणि आपल्या जवळ आहे फक्त त्याच गोष्टीत समाधान मानून जगणं हे शिकता येत.
यावेळी स्नेहांगण दिव्यांग शाळेतील शिक्षिका सौ. प्रगती लोनारकर म्हणाल्या, मागील अनेक वर्षांपासून आम्ही या दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना काही मोजकेच तरुण तरुणी इथे येऊन भोजनसेवा देत असतात. कारण हा आश्रम तुमचा माझा सर्वांचा आहे, येथील दिव्यांग मुलामुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम आम्ही करत असतो.अनेक दिव्यांग व्यक्तींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी येथे मदत केली जाते.
या आनंदोत्सवाच्या वेळी महाराष्ट्र संदेश न्युज चे मुख्य संपादक प्रशांत जगताप, प्रसिद्ध कवियत्री मयुरी टेंभरे, प्रसिद्ध मॉडेल प्रगती येसनसुरे सह शाळेतील शिक्षक आणि त्यांचे इतर सहकारी शिक्षक मदतीस उपस्थित होते.

