अक्षय जाधव पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील कोथरूड परिसरात एका 30 वर्षीय नराधमाने एका 4 वर्षीय चिमुकली मुलीबरोबर अश्लील कृत्य केल्याचा संपावजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, 30 वर्षीय नराधम आरोपीने एका 4 वर्षीय बालिकेला आडोशात नेले. यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ही मुलगी जोरात रडायला लागली तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. यानंतर परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित पोलिसांना बोलावून घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून राजेश चोरगे असे आरोपीचे नाव आहे.
कोथरूड येथे राहणारी 4 वर्षीय बालिका घरासमोर खेळत होती. ते खेळत असताना आरोपी चोरगे याची नजर तिच्यावर पडली. यानंतर त्याने मुलीजवळ जाऊन तुला फिरायला घेऊन जातो असे सांगितले. असे म्हणून त्याने तिला सोसायटीच्या बाहेर लावलेल्या एका बस जवळ नेले. यावेळी त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ती रडू लागले आणि हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर परिसरातील रहिवाशांनी आणि मुलीच्या आजोबांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे पुन्हा राज्यात महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न उभा राहिला आहे.

