पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं.२१६ / २०२३ भा.द.वि. कलम ३८० ४५७.३४ या दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीने किन्सेट हायस्कुल अॅड ज्युनियर कॉलेज गुलटेकडी पुणे येथील शाळेच्या पाठीमागील लोखंडी ग्रील तोडुन महीलांचे केसांचे विग परीधान करून वेशांतर करुन शाळेच्या अकाउंट रुममध्ये प्रवेश करुन ड्रॉवर मधील १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरी करून पसार झाले होते.
तरी सदर घटनेबाबत तपास पथकातचे सह प्रभारी पो.उप निरी अशोक येवले यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार यांना आदेशीत केल्याने त्यांनी सलग २४ तास सी. सी. टी. व्ही कॅमेरे चेक केले असता सदर आरोपी यांनी महीलांचे केसांचे विग परिधान करून सदर चोरी केल्याबाबत दिसुन येत होते तरी परीसरातील अधीक सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन सदर आरोपीचे हातावरील टॅटू दिसुन आल्याने सदर टु वरुन आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपीस हा नेपाळ येथील असुन ते गुलटेकडी परीसरामध्ये राहणारे असल्याचे माहीती मिळाल्याने तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक येवले व पो.अं. सुजय पवार यांनी सापळा रचुन व त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता ते विधीसंघर्षीत असल्याचे समजले तसेच त्यांचेकडे दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी ही नवीन दुचाकी गाड़ी घेण्यासाठी चोरी केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने त्यांचेकडुन शाळेमधील चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे, तसेच दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक उमेश कारके हे करीत आहे.
सदरची कामगीरीही मा. श्री प्रविण पाटील अप्पर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मर्तना पाटील सो. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा. श्री. नारायण शिरगावकर साो. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सोमनाथ जाधव यांच्या सुचना व आदेशान्वये तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक येवले व पो.हवा. मुकुंद तारु, पो. अं. सुजय पवार पो. अं. सोमनाथ कांबळे, पो. अं. शिवदत्त गायकवाड, पो.अं. फिरोज शेख, पो. अं. प्रविण गोडसे पो. अं.अनिस शेख पो. अं. रमेश चव्हाण पो. अं. संदीप घुले पो. अं.दिपक खेदाड यांनी केली आहे.

