पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १४/०९/२०२३ रोजी रात्रौ ०० /३० वाचे सुमारास फिर्यादी नामे मुकेश सपकाळ वय ४२ त्यांचे मित्रासह चिमाघाट येरवडा येथे ब्रिजखाली बसले असता तेथे अनोळखी चार ते पाच इसमांनी फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार करुन खिशातील ९०,०००/- रु काढून घेवून गेले आहेत म्हणून येरवडा पो. स्टे. गु. र. नं. ६३३/२०२३ भादवि ३९४, ३९५ ३९७, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अमलदार राहुल परदेशी, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे येरवडा भागात येणार आहेत. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व अंमलदार राहुल परदेशी, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यास त्यांचे नाव पत्ता विचारता १. आकाश हनुमंत भंडारी उर्फ दशरथ वय २३ वर्षे रा वडारवस्ती येरवडा पुणे २. अनुज सोमनाथ जोगदंड वय १९ वर्षे रा ताडीगुत्ता येरवडा पुणे ३. योगेश दिलीप नवघणे वय ३० वर्षे रा गोकुळनगर कोढवा पुणे ४. सलमान फारुख कुरेशी वय २३ वर्षे रा शनी अळी येरवडा पुणे ५. शिवकुमार संजय शेलार वय २२ रा भाजी मंडई येरवडा पुणे ६. दुर्गेश संजय सातकर वय २१ रा शनी अळी येरवडा पुणे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस दि. १५/०९/२०२३ व दि. १६/०९/२०२३ रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हयामध्ये वापरलेली ३ लाख रु किंमतीची चारचाकी गाडी व १९,०००/- रु रोख रक्कम असा एकूण ३ लाख १९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पर्णकुटी चौकीचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक महेश लामखेडे करत आहेत.
सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४ श्री संजय पाटील सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्रीमती कांचन जाधव, पोनि गुन्हे, श्री. जयदिप गायकवाड, पोनि गुन्हे येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, अजित वाघुले यांनी केलेली आहे.

