प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हमदापूर सर्कल मधील पहेलवानपुर गावातील नाल्याच्या पूल नाला खोलीकरण दरम्यान कंत्रातदाराने तोडला असल्याने तीन गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा संपर्कच तुटला असून आज यासंदर्भात उपविभागीय अधिकारी दिपकजी करंडे वर्धा यांना निवेदन देण्यात आले हमदापूर सर्कल मधील पहेलवानपुर गावातील नाल्याच्या पूल नाला खोलीकरण दरम्यान कंत्रातदाराने तोडला त्यामुळे आजूबाजूच्या तीन गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्या-येण्याकरीता रस्ताच राहीलेला नाही, पहेलवानपुर, शिवणगाव व चिंचोली य तीन गावातील शेतकाऱ्यांच्या शेत्या नाल्याच्या पार असून या नाल्यावरती असलेल्या पुलावरून शेतकरी शेतात जाणे येणे करत होते.
या नाल्याचे खोलीकरण करत असतांना नाल्या वरील सर्व ढोले कंत्राटदराने काढून टाकले. नाल्याचं काम पुर्ण झाल्यानंतर हे ढोले टाकून रस्ता पूर्ववत करून देण्याचे काम संबंधित कंत्राटदाराचे होते. मात्र या कंत्राटदाराकडून या नाल्यावरील पूल न टाकता रस्ताच ठेवण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार करण्यासाठी सेलू येथील तहसीलदारांना गाठले. तहसीलदारांनी मात्र शेतकऱ्यांची थट्टा करत छोटयाश्या नाल्यातील पाण्यात डोंगा टाकून शेती करावी असा सल्लाच देऊन दिला. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी या शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दहा दिवसाच्या आत या नाल्यावर ढोले टाकून शेतकऱ्यांची शेतात जाण्याची व्यवस्था न करून दिल्यास याच नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह राजेशभाऊ धोटे, माजी नगरसेवक अशोक पराते, अमोल बोरकर, उमेश नेवारे, प्रमोद झाडे, हेमराज झाडे, आशिष तमगीरे, अनिल झाडे, बळवंत कांबळे, शरद झाडे, चंद्रभान पेरकुंडे, भारत हिवांज, विजय मुडे, राजू मुडे आदी उपस्थित होते.
पाहणी केली असता हमदापुर सर्कल मधील पैलवानपूर शिवणगाव चिंचोली या गावातील शेतकऱ्यांना शेतात ज्या पुलावरून रोज ये-जा करावं लागते तो पूल मुसळधार पावसाने खरडून सरसकट वाहत गेला आहे आता शेतकऱ्यांना व महिलांना तसेच बैलांना(जनावरांना) शेतात जाण्याकरिता नालाच्या पाण्यातून शेतात जावे लागत आहे. या नाल्याच्या पाण्यातून जाण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहेत याकडे शासनाने ताबडतोब लक्ष घालून त्या पुलाचे काम सुरू करून हमदापुर सर्कलमधील पहेलवानपूर, शिरसगाव, चिंचोली या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा दहा दिवसाच्या अल्टीमेट नंतर जलसमाधी आंदोलनाचा इशारा अतुल वांदीले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

