पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- फिर्यादी नितेश कांबळे वय २४ वर्षे हे झोमेंटो द्वारे आलेली ऑनलाईन ऑर्डर घेवून दिनांक- १२/०९/२०२३ रोजी पहाटे ०१२/२० वा. ते ०२/१५ वा. चे दरम्यान मॅजेस्टीक नेस्ट सोसायटी समोरील मोकळया जागेसमोर, फुरसुंगी गाव पुणे या ठिकाणी आले असताना, ऑर्डर मागवणारे तिन इसमांनी ऑनलाईन जेवन मागवून, ऑर्डर का उशीरा आली, तुला पैसे देणार नाही असे बोलून, मागविलेले जेवनाची ऑर्डर घेवून, ऑर्डरचे पैसे न देता, फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम ५२००/- रुपये तसेच रेडमी कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट जबरदस्ती काढून घेवून, मोबाईलवरुन जबरदस्ती एकुण २८८०/- रुपये ऑनलाईन कोणाचे तरी युपीआयवर ट्रान्सफर करुन घेवून तेथून हाकलून दिले. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १४२४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, अमोल दणके, शाहीद शेख, चंद्रकांत रेजीतवाड असे तपास करीत असताना आरोपींबाबत फुरसुंगी भागात माहीती घेत असाताना तपासपथकातील अंमलदार प्रशांत दुधाळ व अमोल दणके यांना गोपनीय माहीती मिळाली की, फुरसुंगी गावाचे ओळ्यालगत गुन्ह्यातील आरोपी थांबलेले आहेत. सदर ठिकाणी जावून तपास टिमने सापळा रचून आरोपी नामे १) अरूण दिगंबर राऊत वय २० वर्ष रा. पवार आळी फुरसुंगी पुणे. २) कुणाल कैलास गायकवाड वय २० वर्ष रा. सदर व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून फिर्यादी यांचा मोबाईल व रोख रक्कम असा कि.रु. १०,२००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुशील डमरे पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मँडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे साो, पोनि (गुन्हे), श्री. संदीप शिवले सो पोनि. (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

