मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यातील शिक्षकांचे डिजिटल साप्ताहिक शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर, वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिल्या जाणारा कर्तुत्वान शिक्षक पुरस्कार शहरातील जी बी एम एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हिंगणघाटचे भाषा शिक्षक डॉ अनिस मोहम्मद बेग यांना नुकताच शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला जाहीर झाला होता.
या पुरस्काराचे वितरण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार समिर कुणावर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षक ध्येय चे कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, पत्रकार तथा वर्धा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रा. किरण वैद्य ,व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
डॉ अनिस बेग यांनी ”भाषा या विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण करणे” या उपक्रमाचा प्रस्ताव सादर केला होता. या उपक्रमाचा उद्देश, कार्यवाही व उपयुक्तता ही विद्यार्थ्यासाठी किती हितावह आहे हे लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी राज्य स्पर्धेत निवड करण्यात आली. डॉ बेग यांच्या शैक्षणिक कार्याला अनेक संस्थेनी पुरस्कृत केले आहे. शिक्षक ध्येय चे वतीने राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक’ पुरस्कार योजनेचे आमदार समिर कुणावर यांनी कौतुक केले. शिक्षक ध्येय साप्ताहिक फक्त विविध स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यातील उपक्रमशिलतेला प्रोत्साहन देते व त्यांच्या कार्याला पुरस्कृत सुद्धा केल्या जाते.
यावेळी पुरस्कार प्राप्त करून शाळेचे नाव महाराष्ट्रात प्रकाशात आणल्या बद्दल त्यांचे प्रा. फारीश अली, प्रा. ठाकडा, प्रा. ढगले, रवि रोहणकर, निसर्ग साथी फाउंडेशनचे सचिव नियाजुद्दीन सिद्धीकी, धोटे सर आदींनी अभिनंदन केले आहे.

