आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील अल्लीपुर येथे एका घरात 21 वर्षीय तरुणीची मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. श्यामल उत्तमराव वैद्य वय 21 वर्ष असे मृतक तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या कथित प्रियकरावर संशय व्यक्त होत आहे.
अल्लीपुर येथील जयभीम वार्डात राहणाऱ्या वैद्य कुटुंबातील श्यामल ही यवतमाळ येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती. सलग सुट्ट्या आल्याने ती घरी आली होती. घरी घटना घडली तेव्हा आईवडील दोघेही घराबाहेर असल्याने ती एकटीच घरी होती. कुटुंबीय घरी आले तेव्हा श्यामलचा मृतदेह घरी संशयास्पद स्थितीत पडून होता. यावेळी आई वडिलांचा पायाखालची वाळू सरकली.
त्यानंतर या घटनेची माहिती अल्लीपुर पोलिसांना देण्यात आली. घटनेची गांभीर्य ओळखून अल्लीपुर पोलीस आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाली. यावेळी प्राथमिक तपासात या तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यावेळी अल्लीपुर पोलिसांना मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहश विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला.
घटना घडली तेव्हा एक युवक घरी आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. श्यामल घरी एकटी असल्याचे पाहून तो घरी येत वाद करायला लागला. वाद विकोपस गेल्यावर त्याने हत्या केल्याचे म्हटल्या जाते. प्रियकरानेच ही हत्या केल्याची माहिती मिळत असून त्याला लवकरच अटक केल्या जाईल, असे अल्लीपूर पोलिसांनी नमूद केले आहे.

