स्थानीक पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद
रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- परतूर शहरांमध्ये अवैध धंद्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. परतूर शहरात अवैध मटकयाचे जुगार अड्डे चालविल्या जात आहे. दरम्यान पोलीस प्रशासन चिरीमिरी घेत या सर्व धंद्यांना पाठबळ देत असल्याने सर्वसामान्यांचे संसार उघड्यावर येत आहे.
परतुर शहरात होलानी दालमील गल्लीमध्ये, रेल्वे स्टेशन परिसरात,कृषी उत्पन्न बाजार समिती च्या बाजूला हॉटेलमध्ये , मलिशाह चौक गांव भागात, जुन्या पोलीस चौकीच्या बाजूला, सेलू रोड, वर मटका एजंट मोबाईलवर मटका घेतला जात आहे,
मटका, जुगाराचे आडे,अवैध वाळू वाहतुक, सर्व प्रकारचे अवैध धंदे भीती न बाळगता सुरू आहेत.
सर्व एजंटची वसुली गायकवाड नावाचा एक इसम करीत आहे, परतुर शहराचे40ते 45 एजंट खुल्या आम मटका घेत आहे पोलीस प्रशासन एजंट वर व मटका मालकावर कारवाई का करत नाही, हा विषय चर्चेचा ठरत आहे.
या बेकायदेशीर धंद्याना पोलिसांचा आर्शिवाद आहे काय? असे एजंटाच्या मार्फत समजले जात आहे
सनासुदीच्या दिवसात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. शहरात दिसुन येत आहे.
कल्याण-मुंबई नावाचा मटका मोबाईल टू मोबाईलच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांनी ठराविक नंबर व ठराविक जागा निश्चित केलेल्या आहेत हे घरी बसूनच मोबाईल वर आकडे घेतली जातात, व पेमेंट मोबाईलच्या माध्यमातून आँनलाईन दिले जाते. यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. यांच्यावर आज कारवाई झाली नाही तर भविष्यात शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत जाईल
यावर जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, शैलेश बलकवडे अंकुश लावतील का? अवैध धंदे बंद होतील की नाही अशी चर्चा शहरातील नागरिकांत होत आहे परिणामी तालुक्यातील शेकडो तरुण व्यसनाच्या व झटपट पैसे कमवायच्या नादात मटका जुगाराच्या आहारी जात आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

