महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बिहार:- राज्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. खुसरूपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोसिमपुर गावात एका दलित महिलेला नग्न करत अत्यंत क्रूरपणे मारहाण करून त्यानंतर पिढीत महिलेला या नराधम आरोपींनी मलमूत्रही पाजलं. आरोपींमध्ये बाप आणि लेकाचा समावेश आहे.
पिढीत महिलेने आरोपी कडून कर्ज घेतल होत त्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही आरोपी महिलेकडे अधिक पैशांची मागणी करत होते. महिलेने मात्र पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळे नराधम आरोपींनी रात्री तिच्या घरात घुसून हे धक्कादायक कृत्य केले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी प्रमोद सिंग आणि त्याचा मुलगा अंशू आपल्या चार साथीदारांसह रात्री 10 वाजता महिलेच्या घरात घुसले होते. त्यानंतर पिढीत महिलेला जबरदस्ती आपल्या घरी घेऊन गेले होते. या महिलेला घरी नेल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण केली. महिलेला काठीने मारहाण करण्यात आला. यानंतर तिला नग्न केलं. इतकंच नाही तर प्रमोद सिंग याने आपल्या मुलाला महिलेच्या तोंडात मूत्रविसर्जन करण्यास सांगितलं. पण पीडित महिला तेथून पळ काढण्यात यशस्वी झाली. महिलेने पळ काढला आणि आपलं घर गाठलं.
पोलीस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने काही महिन्यांपूर्वी प्रमोद सिंग याच्याकडून व्याजावर 1500 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. महिलेने व्याजासह हे सगळे पैसे परत केले होते. पण यानंतरही आरोपी महिलेकडून पैसे मागत होते. पण महिला पैसे देण्यास नकार देत होती. प्रमोद सिंगने महिलेला जर पैसे दिले नाही तर तुला नग्न करुन गावात फिरवेन अशी धमकी दिली होती. महिलेने पोलिसांकडे या धमक्यांबद्दल तक्रार केली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. पीडित महिलेचं कुटुंब आणि दलित समाज आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

