नितीन शिंदे , ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत डोंबिवली पूर्व येथील “फ” प्रभाग सुद्धा आहे. तो फक्त कागदावर आहे. या प्रभागात फेरीवाले बिन्धास्त आहेत त्यांना कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची अजिबात भीती राहिलेली नाही या मुळे या रस्त्यावरून (रस्ता तर राहिला नाही पण कागदावर आहे) घरी जाताना जेवढे कष्ट सोसावे लागतात तेवढे कष्ट मुंबई ते डोंबिवली प्रवास करताना होत नसेल कारण भले उशीर होईल पण ईतर ठिकाणी रस्ता तर आहे ईथे “फ” प्रभाग च्या मेहरबानी मुळे रस्ताच राहिला नाही.
काही नागरिक तर असे सुद्धा बोलतात की या फेरीवाल्यांमुळे कदाचित कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच बजट मोठ्या प्रमाणात वाढत आहेत म्हणून ईथले कार्य तत्पर कर्मचारी ईथे लक्ष देत नाही, शिवाय या परिसरात आपल्याला आपल्या डोंबिवली चे फेरीवाले दिसणार नाही बाहेरून आयात केलेले कमिशन तत्वावर फूटपाथ आणि रस्ता काबीज करून तिथे आपल बस्तान मांडणारे फूटपाथ माफिया दिसणार, आपण डोंबिवलीकर एकदम शांत आणि आपल्याला काय करायच आहे या तत्वाशी एकनिष्ठ आहोत म्हणून हे सर्व चालत आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी दिल्या आहे.
पुढे बोलताना हे नागरिक म्हणाले की, इथून वस्तू घेणे टाळा कारण ईथे मापात पाप सुद्धा होत आहे, आणि हळू हळू इथे गुंड प्रवृत्तीचे लोक आले आहेत जे आपल्याला विरोध केल्यास मारहाण करायला सुद्धा कमी करणार नाही, अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्ह्या आपापल्या परीने विरोध करा. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या पिपी चेंबर येथील कार्यालयात भेट देऊन तक्रार करून आपली जबाबदारी पार पाडा, मेल करा, ट्विट करा अर्ज करा आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार करा. पण काही तरी करा नायतर आजच आपल दुर्लक्ष उद्या आपल्या साठी त्रास दायक ठरणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348