पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये भारतीय नागरीकांना एकत्रीत आणण्यासाठी लोकमान्य बालगंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणपती उत्सवास सुरूवात केली व त्यामधुन एक क्रांती घडवली त्याच उत्सवात धार्मीक सलोखा राखण्यासाठी कोढवा पोलीस ठाणे व जिल्हा विधी सेवा प्राधीकरण पुणे यांच्यावतीने कोंढवा परिसरातील सर्वधर्मीय नागरीकांना एकत्र करून गणपतीची सामुहिक आरती आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे, मा. सोनल पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवीका रंजना टिळेकर, नगरसेवीका नंदा लोणकर, रईस सुडके, हाजी फिरोज शेख, जालींदर कामठे, जाहीद शेख, मणीपुरी विद्यार्थी, नायजेरियन विद्यार्थी, तसेच बोहरा व मुस्लिम धर्मिय नागरिक तसेच इतर धर्मीय नागरीक मोठ्या संख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व धर्मिय नागरिक, पोलीस अधिकारी, महीला सामाजिक कार्यकर्त्या यांच्या उपस्थितीत व हस्ते गणपतीची आरती करण्यात आली, त्यामध्ये सगळ्यांनी सामजिक स्वास्थ्य व एकोपा टिकवण्याचे आश्वासन यावेळेस आपआपल्या भाषणामध्ये दिले. याप्रसंगी तानाजी लोणकर, कुजेन नगरवाला, संदिप बधे, प्रविण दरेकर, राजेंद्र भिंताडे, अस्लम बागवान, छबील पटेल, ओमप्रकाश राजपुरोहीत, हर्षद लोढा, अमोल धर्मावत, गौरव कामठे, शाहीद शेख, अबीद सय्यद, गणेश शिंदे, मुबीन खान, शान दिल्लीवाला, राकेश कामठे, आनंद दुबे हजर होते.
कार्यक्रमाचे संयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले होते त्यांनी सांगीतले की कोंढवा येथे मिश्रवस्ती असल्याने समाजामध्ये एकोपा टिकविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमाची आखणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे, तसेच सूत्र संचालन पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांनी केले असुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, सचिन थोरात, राजेंद्र उसगांवकर, गणेश तोरगल, योगीता कुदळे, हरीष शिळमकर, विकास बाबर, तसेच पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, रत्नदिप बिराजदार, स्वप्निल पाटील, समाधान मचाले, पुजा पाटील, हसीना शेख, बालाजी डिगोळे, विजय वगरे, शंकर लोंढे, इकबाल शेख कोंढवा पोलीस ठाणे पुणे यांनी विशेष प्रयत्न केले.