संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर : शहरातील प्रसिद्ध इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) मधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील स्त्रीरोग व प्रस्तुती शास्त्र विभागातील वार्डात रुग्णाचे पाय वर ठेवण्यासाठी चक्क रुग्ण झोपलेल्या रुग्णशय्ये खालील दोन पायाला सिमेंटचे गट्टू लावले जात आहे. हे गट्टू सरकून रुग्णाचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
मेयो रुग्णालयातील वार्ड क्रमांक 26 स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचा या वार्डात महिलेच्या प्रसुतीनंतर महिला व नवजात बाळाला ठेवले जाते. मंगळवारी येथील एका रुग्ण बसलेल्या रुग्णाशय्येच्या दोन पायाखाली चक्क सिमेंटचे दोन गट्टू लावण्यात आले होते. रुग्णशय्येच्या एका भागातून उंची वाढवण्यासाठी हे केल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत उतरमारे यांना सांगितले, या महिलेचे पाय वर ठेवण्यासाठी विशिष्ट रुग्णशय्या उपलब्ध करणे अपेक्षित होते. परंतु, रुग्ण झोपलेल्या रुग्णशय्ये च्या दोन पायाखाली गट्टू लावून या रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हे धक्कादायक चित्र बघता. मेयो रुग्णात डोके व पाय वर खाली करण्याची सोय असलेल्या रुग्णशय्या शासनाने दिली नाही काय? गरिबांना चांगला उपचार घेण्याचा येथे अधिकार नाही काय? हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नागपूर शहरातील अशा मोठ्या रुग्णालयात आरोग्य सेवा अशा प्रकारे कारभार सुरू आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था वर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
कधी कधी काही कारणास्तव रुग्णाला डोके खाली व पाय वर करावे लागतात. त्याला आम्ही हेड लो पोझिशन म्हणतो त्यासाठी या वार्डात रुग्णाच्या रुग्णशय्ये खाली गट्टू लावणे असावे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे आश्वासन डॉ. राधा मुंडे वैधकीय अधीक्षक, मेयो रुग्णालय नागपूर यानी दिली

