पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- सत्य शोधक समाज व अन्याय अत्याचार निवारण नागरिक समितीच्या वतीने विविध विषयासाठी नागपुर शहरातील संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
सत्य शोधक समाज व अन्याय अत्याचार निवारण नागरिक समितीच्या वतीने दि. 27 सप्टेबर रोजी नागपुर शहरातील संविधान चौकात धरने आंदोलन करण्यात आले यावेळी 15 ज्वलंत विषयावर नागपुर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिष्ट मंडळाने भेटु घेऊन राज्याचे मुख्यमंत्री याच्या नावाने निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाचे मुख्य सयोजक नागमित्र धर्मेश पाटील, केशव डोंगरे, रवींद्र गुजर, रवींद्र हुमने, लालुजी शेवाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेल्या एक दिवसीय धरना आंदोलनात नागपुर शहरातील गणमान्य सत्यशोधक विचारवंत हरीकिशन हटवार, राजकुमार गणविर,प्रमेश मुखिया, सुरेशबाबु डोंगरे, गिता नितनवरे, सुनिल वानखेडे, श्री. ऊके कामठी, गौतम तिरपुडे, वसंतराव फुलझेले, देवांगना भोयर, कृष्णाजी बोडलखंदे सह शेकडो नागरिकांनी व जागरुक सन्घर्षकारी संघर्षशील नागरीकानी दिवसभर संविधान चौकात आंदोलनात सहभागी होवुन आपला आवाज बुलंद केला.
सत्य शोधक समाज स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाली आहे. समतेचा परलेला लढा हा मानव कल्याणाचा लढा आहे. यात सर्व नागरिकांनी समाविष्ट होऊन हा विचार गतिमान करण्यासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे. शोधक समाज स्थापनेला 150 म्हणुन 150 ठिकाणी तिन तासाचे सत्यशोधक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामधुन संत गुरू अरहन्ताचे सत्यशोधक विचारधन संविधान अधिकार याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348